आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Court Advocate Woman Missing From Manmad Station

मुंबईची महिला वकील मनमाड स्टेशनवर गायब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड - मुंबई उच्च न्यायालयातील विवाहित वकील महिला मुंबई-औरंगाबाद देवगिरी रेल्वेने प्रवास करत असताना 3 जुलै रोजी मध्यरात्री मनमाड रेल्वेस्थानकावरून अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. नीलम सोळंके (29) असे महिलेचे नाव असून या प्रकरणी त्यांचे पती प्रवीण यांनी मनमाड पोलिसांत तक्रार दिली आहे.

मुंबईतील कुलाबा येथे राहणार्‍या अ‍ॅड. नीलम या 3 जुलै रोजी मुंबई-नांदेड देवगिरी एक्स्प्रेसने एसी आरक्षित कोचमधून औरंगाबादकडे येत होत्या. मनमाडला पहाटे 3.30 च्या सुमारास देवगिरी एक्स्प्रेस आली असता अस्वस्थ वाटल्याने त्या खाली उतरल्या. मात्र, तेवढ्यात गाडी सुटली. त्यांचे सर्व सामान गाडीतच राहिले होते. त्यानंतर गाडीतील सामान उतरवून घेण्याचा निरोपही त्यांनी दिला होता. मात्र, तेव्हापासून त्या अजूनही बेपत्ता आहेत. त्यानंतर पत्नी हरवल्याची तक्रार पतीने मनमाड पोलिसांकडे दिली.

पतीलाही निरोप दिला
नीलम यांनी आपल्या पतीला कळवून सामान औरंगाबादला उतरवून घेण्यास सांगितले व स्टेशन मास्तरकडून पुढील गाडीची माहिती घेऊन औरंगाबादला येत असल्याचे सांगितले. पण त्यानंतर तीन दिवस झाले तरी त्यांचा पत्ता लागलेला नाही.