आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात पारा चाळीस अंशांकडे, मे महिना कडक उन्हाचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने मे महिन्यात कडक उन्हाळा जाणवणार आहे. शनिवारी उन्हाची तीव्रता असल्याने शहरातील हवामान केंद्रात कमाल ३९.७ अंश सेल्सिअस अशी तपमानाची नाेंद झाली. तर, किमान तपमान हे २० अंश सेल्सिअस असे नाेंदले गेले. त्यामुळे पारा पुन्हा चाळिशीकडे सरकू लागला अाहे.
एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने गत आठवड्यात गेल्या तीन वर्षांनंतर कमाल तपमान हे ४०.६ अंश सेल्सिअसवर गेले होते. त्यानंतर पारा घसरून तो ३७ ते ३८च्या दरम्यान स्थिरावला होता. मे महिना लागताच पुन्हा पारा चाळिशी पार करणार असल्याचा अंदाज आहे.
शनिवारी कमाल तपमान हे ३९.७ अंश सेल्सिअस, तर किमान २० अंशांची नोंद करण्यात आली. त्यामुळे शनिवारी उन्हाच्या झळांमुळे शहरवासीयांनी घरात किंवा कार्यालयातच राहण्याला प्राधान्य िदले. वाढत्या तपमानामुळे लहान मुलांना तापाची आणि कांजण्या निघण्याची साथ सुरू झाल्याने रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे.