आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिपायांची पदे नऊ अन‌् अर्ज साडेबाराशे, उच्चशिक्षितांच्या अर्जांमुळे बेकारी स्पष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उच्चशिक्षितांचाभरणा राेजगाराची वानवा यामुळे पात्रतेप्रमाणे नाेकऱ्या मिळत नसल्याने अाता पदव्युत्तर पदवी धारकांपासून ते थेट अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्यांवर महापालिकेत कंत्राटी शिपाईपदाच्या नाेकरीसाठी अर्ज करण्याची वेळ अाल्याचे चित्र अाहे. पालिकेच्या वैद्यकीय विभागातील शिपाईपदाच्या नऊ कंत्राटी पदांसाठी तब्बल १२४१ जणांचे अर्ज प्राप्त झाले असून, अर्जदारांचे शिक्षण बघून प्रशासन हैराण झाले अाहे. दरम्यान, शिपाईपदाच्या भरतीसाठी गर्दी लक्षात घेत लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला अाहे.

उच्चशिक्षितांना याेग्यतेप्रमाणे नाेकऱ्या उपलब्ध हाेताना दिसत नाही. त्यामुळे मिळेल ती नाेकरी स्वीकारण्याची तयारी दाखवली जात असल्याचे अनेक सरकारी खात्यातील भरतीतून यापूर्वीही दिसून अाले. अाता त्याचेच दर्शन महापालिकेच्या एकात्मिक आरोग्य कुटुंबकल्याण समिती, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या कंत्राटी पद्धतीने राबवल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेतून घडले अाहे. मुळात या भरतीमागील अडचणीचे शुक्लकाष्ठ संपलेले नाही. मध्यंतरी नगर परिषद निवडणुकीच्या अाचारसंहितेमुळे प्रक्रिया स्थगित झाली हाेती. ही अाचारसंहिता शिथिल झाल्यामुळे काही पदांसाठी मुलाखती झाल्या; मात्र शिपाईपदासाठी साडेबाराशेहून अधिक अर्ज अाल्यामुळे मुलाखतीएेवजी लेखी परीक्षेद्वारे नियुक्तीचा निर्णय झाला अाहे. विशेष म्हणजे शिपाई पद कंत्राटी असून, जेमतेम सातवी शिक्षणही या पदासाठी पुरेसे अाहे. प्रत्यक्षात अर्जदारांमध्ये दहावी, बारावी, पदवी नव्हे तर थेट पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांची संख्या अधिक अाहे. हेच नव्हे तर तांत्रिक शिक्षण घेतलेल्यांची संख्या अधिक असल्यामुळे महापालिका प्रशासन थक्क झाले अाहे.

२४५ उमेदवार पात्र
स्टाफनर्सच्या पदांसाठी ११५, फार्मासिस्टच्या पदांसाठी १७४, डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या पदांसाठी ३७३, पूर्णवेळ लेखापाल पदासाठी ६०, लॅब टेक्निशियनच्या पदांसाठी ७७, एएनएमच्या १५ पदांसाठी २१७, टीबीएचव्हीच्या पदांसाठी १८४, तर सीनियर ट्रीटमेंट सुपरवायजरच्या पदांसाठी १५७ अर्ज प्राप्त झाले. या सर्व पदांसाठी २४५ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले.
बातम्या आणखी आहेत...