आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-आग्रा महामार्गावर बसखाली एक ठार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी - मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास दुचाकीला एसटी बसने धडक दिल्याने एक जण ठार झाला. ज्ञानेश्वर गोविंद नाठे व त्यांचे साडू अण्णा नामदेव शिंदे (वय 45, रा. ठाणगाव, ता. सिन्नर) दुचाकीवरून (एम.एच. 15 सीएल 6512) लग्नासाठी नाशिकला आले होते. आडगावजवळील कोणार्कनगर येथे महामार्गावर रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने जाणा-या नाशिक-नवापूर बसने (एम.एच. 20 बीएन 1600) दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे नाठे दूर फेकले गेले, तर पाठीमागे बसलेले शिंदे बसच्या चाकाखाली सापडले. अंगावरून चाक गेल्याने ते जागेवरच ठार झाले.
पोलिसांनी बसचालक शेख मुजीर नसिरुद्दिन अन्सारी (रा. साक्री) यास अटक केली आहे.
अपघातांची मालिका - महामार्गावर अपघातांमध्ये महिनाभरात तिघांचा जीव गेला आहे. अवजड वाहतूक पादचारी आणि दुचाकीचालकांच्या जिवावर बेतत असल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. आडगाव पोलिस ठाण्यात गेल्या वर्षभरात अपघातांचे 164 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात सुमारे 40 जणांचा बळी गेला आहे. रहिवासी परिसरात वाहतूक कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.