आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्ग बसस्थानक परिसरात ट्रॅव्हल्सची दादागिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महामार्गबसस्थानक परिसरात खासगी ट्रॅव्हल्स बसमुळे वाहतुकीचा खाेळंबा नित्याचाच असून, त्यामुळे वाहनचालकांना माेठीच कसरत करावी लागत आहे. या परिसरात खासगी ट्रॅव्हल्सचीच दादागिरी असून, येथे उभ्या राहणाऱ्या या बसमुळे निम्म्यापेक्षा अधिक रस्ता व्यापला जाताे. मुंबई नाका ते त्र्यंबक नाका सिग्नलपर्यंत दुतर्फा विविध व्यापारी संकुलांना पुरेशी पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने शहरातील या प्रमुख मार्गाचादेखील संकोच होताना दिसतो.
या परिसरात हाॅटेल्स, माॅल्स, रुग्णालये, ट्रॅव्हल्स कार्यालये, पेट्राेलपंप, सरकारी कार्यालये, मंदिर, चर्च असून, मुंबई नाक्याला जाेडणारा हाच रस्ता असल्याने त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. परंतु, या परिसरातील कार्यालये, दुकाने अाणि उपराेक्त वास्तूंना पार्किंगची पुरेशी व्यवस्थाच नसल्याने वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. त्यामुळे रस्ता अरुंद हाेऊन वाहने खाेळंबतात. संदीप हाॅटेल परिसरात ट्रॅव्हल्स कंपन्यांची अनेक कार्यालये अाहेत. या भागात रस्त्यातच ट्रॅव्हल्सच्या बस उभ्या करून वाहतूक विभागाला अाव्हान दिले जाते.
खासगी वाहतूक करणारी वाहने अाणि रिक्षादेखील सर्रासपणे रस्त्यातच उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीच्या खाेळंब्याला सीमाच उरत नाही. परिसरात कायम असलेला फेरीवाल्यांचाही वावरही त्यात भर टाकतो. ट्रॅव्हल्स बस अाणि फेरीवाले यामुळे परिसरात चालायलादेखील रस्ता उरत नाही. अशा गर्दीतून वाहन बाहेर काढणे अवघड हाेऊन बसते. शहराचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिर परिसरातील इमारतींनाही पार्किंगची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे अापोआपच वाहने रस्त्यावर उभी राहतात. कालिका मंदिरात दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. परंतु, मंदिरासाठीदेखील स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याचे चित्र आहे.