आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदी सिनेमाने साधले राष्ट्रीय ऐक्य, डॉ. अंबरिश मिश्र यांनी उलगडली ‘सिनेमाची शंभरी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- हिंदी सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात विविध प्रांतांतील लाेकसिनेमाच्या अाकर्षणाने मुंबईत दाखल हाेत हाेते. अभिनेते अाणि अभिनेत्रींची अनेक उदाहरणे त्याकरिता देता येतील. त्यामुळे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एेक्य साधले गेले, असे म्हणता येईल. इतर देशांत िसनेमात वापरल्या गेलेल्या वस्तूंचे संग्रहालय केले जाते. त्यातील वस्तू जतन करून ठेवल्या जातात. मात्र, अापल्या हिंदी सिनेमाचे तसे नाही, येथे िसनेमाचा इतिहासही अपवादात्मक जिहिल्याचे दिसून येत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक डाॅ. अंबरिश मिश्र यांनी केले.
सार्वजनिक वाचनालयातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या ग्रंथालय सप्ताहात ‘शंभरीतील िसनेमा’ या विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना डाॅ. मिश्र बाेलत हाेते. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. विलास अाैरंगाबादकर, डाॅ. वेदश्री थिगळे, नाट्यगृह समितीचे प्रमुख सुरेश गायधनी अादी हाेते. डॉ. मिश्र म्हणाले की, सन १९४५ ते ५० नंतर िचत्रपटसृष्टीत मूलभूत बदल झाले. मूक सिनेमा याच कालावधीत कथन शैलीकडे वळला. त्याचे अाकर्षण इतके हाेते की, अगदी प्रेमचंदही काही काळ िसनेमाकडे वळाले. सन १९७० पर्यंत िसनेमात मानवी जीवनातील सुख-दु:खे मांडली जात असल्याने ते अापल्या जीवनाशी िमळते-जुळते असल्याची भावना प्रेक्षकांत िनर्माण व्हायची. सुरुवातीच्या िचत्रपटांत भारतीय परंपरा िदसायची. भलेही िचत्रपटाची गती संथ असेल, पण त्यात काव्यमयता हाेती, याकडे डाॅ. मिश्र यांनी लक्ष वेधले. अाजचेिचत्रपट पाहत नाही : अाजचेचित्रपट मात्र पाहावेसे वाटत नाहीत मी ते पाहतही नाही, असे स्पष्ट करतानाच अाजच्या िसनेमांतील गाणी सकाळी एेकली, तर सायंकाळी लक्षात राहत नाहीत. कारण, त्यात मेलडी नसते. जुन्या िहंदी िसनेमांतील गाणी मात्र अाजही अापल्या अाेठांवर सहज रेंगाळतात याकडे िमश्र यांनी लक्ष वेधले.
जगन पवार यांचा पुरस्काराने गौरव-
अादिवासीक्षेत्रात गेल्या चाैदा वर्षांपासून काम करणाऱ्या वनवासी कल्याण अाश्रमाचे पेठ तालुक्यातील कार्यकर्ते जगन पवार यांचा सावित्रीबाई वावीकर पुरस्काराने या वेळी डाॅ. अंबरिश िमश्र यांच्या हस्ते सन्मान करण्यात अाला.