आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू कुटुंब करतेय ३८ वर्षांपासून दर्ग्याची सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणार गल्लीतील सय्यदसाहब बाबांचा दर्गा. - Divya Marathi
लोणार गल्लीतील सय्यदसाहब बाबांचा दर्गा.
नाशिक- शहरातीलरविवार पेठ परिसरातील लोणार गल्लीत राहणाऱ्या सानप कुटुंबीयांकडून गेल्या ३८ वर्षांपासून सय्यदसाहब बाबा दर्ग्याची सेवा केली जात असून, दर्ग्याच्या सेवेतून सामाजिक एकतेचा संदेशच या कुटुंबाकडून दिला जात आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही शनिवारी (दि. २५) सानप कुटुंबीयांतर्फे संदल साजरा करण्यात येणार आहे.

सामाजिक सलोखा जोपासतानाच सानप कुटुंबातील लहान मुलांपासून ते जाणत्या माणसांपर्यंत सर्वच आपल्या घराजवळील सय्यदसाहब बाबांची सेवा करतात. सेवेचा एक भाग म्हणून दर वर्षी हजरत सय्यदसाहब बाबा यांच्या दर्ग्याच्या संदल शरीफचे आयोजन करण्यात येते. याच दिवशी सानप बंधूंकडून नियाज (महाप्रसाद) देखील दिला जातो. शहरातील विविध ठिकाणांहून भाविक संदल शरीफमध्ये आवर्जून सहभाग नोंदवतात. शनिवारी होणाऱ्या संदल नियाजच्या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दर्ग्याचे खादिम नंदकुमार सानप यांनी केले आहे.
एकीकडे सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे प्रयत्न होत असताना, सामाजिक सद््भावना वृद्धिंगत होण्याकामी सानप कुटुंबाचा पुढाकार अनुकरणीय ठरणारा आहे.

एकोप्याची भावना जोपासण्याची गरज
आपणसर्वांनी जात-पात, धर्म-पंथ यामध्ये भेदभाव ठेवता आपण सर्व एक आहोत, ही भावना ठेवली पाहिजे. माणुसकी हा एकच धर्म मानला तर प्रत्येक व्यक्तीमध्ये एकाेप्याची भावना निर्माण होऊ शकेल. जगदीशबोडके, अध्यक्ष, उधाण ग्रुप तथा दर्ग्याचे सेवक

पूर्वजांपासून मिळाली प्रेरणा
आजोबा,वडिलांच्या काळापासूनच दर्ग्याची सेवा केली जात आहे. त्यांच्यापासून प्रेरणा मिळाल्याने मी सकाळ-सायंकाळ दर्ग्याची सेवा करीत आहे. दर वर्षी मोठ्या उत्साहात संदल साजरा केला जातो. नंदकुमारबाबूराव सानप, दर्ग्याचे खादिम