आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हिरा होजिअरी’ आगीत खाक, शर्थीच्या प्रयत्नांनंतर १२ तासांनी शमली भीषण आग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दहीपूलपरिसरातील हिरा होजिअरी या दुकानाला शनिवारी (दि. २०) रात्री वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे तांडव सुमारे बारा तास सुरू होते. रविवारी दुपारी वाजता ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आ‍ले. शंभर जवानांनी ही आग अटोक्‍यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. २६ अग्निशमन बंबांनी सुमारे ५० फे-या केल्या. सुदैवाने काणेतीही जीवितहानी झाली नाही.
ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही मात्र, शॉर्टसर्कीटमुळे आग लागली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. हुंडीवाला लेनमधील अन्नपूर्णा इमारतीत हिरा लालवाणी यांचे ‘हिरा होजिअरी’ हे दुकान आहे. या दुकानातून धूर बाहेर पडत असल्याचे शनिवारी रात्री काही नागरिकांना आढळले. ही माहिती भद्रकाली पोलिसांना मिळताच गस्त घालत असलेले सहायक निरीक्षक गणेश जाधव याकूब शेख यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निरोधक यंत्राद्वारे आग विझवण्याचा त्यांनी प्रयत्न केला; मात्र एकदम भडका होऊन आग पसरली. दहा-पंधरा मिनिटांत अग्निशमन दलाचे जवानही या ठिकाणी दाखल झाले. दुकानाचे तळमजल्याचे शटर उघडत नसल्याने पोटमाळ्याकडे जाणारा जिना छोटा असल्याने हा अडथळा दूर करण्यात अाला. जवानांनी वेळीच गॅस सिलिंडर हलवल्याने पुढील अनर्थ टळला.
अग्निशमन जवानांना आग विझविताना अनेक अडथळे आले. यात गॅस कटरद्वारे जाळी तोडून आता पाण्याचा मारा करावा लागला, तर जेसीबीने रस्ता करण्यात आला. घटनास्थळी महापौर अशोक मुर्तडक यांनी भेट देऊन पाहणी केली.
शंभर जवानांचा मोहिमेत सहभाग
आगलागल्याचे समजताच शनिवारी रात्री शहरातील सर्व विभागातील अग्निशमन बंब मागविण्यात आले होते. रविवारी दुपारी वाजता ही आग नियंत्रणातआली. अग्निशमन दलाच्या शंभर जवानांसह अधिकारी या वेळी उपस्थित होते. अनिलमहाजन, प्रमुख,अग्निशमन दल