आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा माहात्म्य: आखाडे, खालसे स्थापनेमागील कारणमीमांसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभमेळा म्हटला की त्यात येणारे साधू, संत, महंत त्यांचे आखाडे, खालसे यांच्या नावांची बरीच चर्चा सातत्याने वर्षभर घडत राहते. मात्र, आखाडे म्हणजे काय? खालसे म्हणजे काय? आखाड्यांची कर्तव्ये कोणती? यासारख्या अनेक बाबी बहुतांश वेळा अज्ञात असतात. त्यामुळे अनेक गैरसमजदेखील समाजमनात रुतून बसलेले असतात. त्या पार्श्वभूमीवर संबंधित साधू, महंतांशी संवाद साधून गवसलेले वास्तव चित्र मांडण्याचा हा प्रयास आहे.

नाशिक-त्र्यंबकला दाखल होतात १३ आखाडे
कुंभमेळ्यात येणारे साधू, महंत हे कोणत्या ना कोणत्या अखाड्याच्या झेंड्याखाली दाखल होत असतात. तसेच त्यांच्या आखाड्यांच्या रुढीनुसार वेशभूषा, केशभूषा, गंध-तिलक प्रकारांचा अवलंब करीतच सिंहस्थाच्या शाहीस्नानात सहभागी होतात. त्यांच्या परंपरांबाबत प्रचंड आग्रही, अधिकारांबाबत सदैव दक्ष असणा-या या आखाड्यांतील प्रमुखांना महंत संबोधले जाते. नाशिक-त्र्यंबकच्या कुंभमेळ्यात दाखल होणा-या आखाड्यांची संख्या १३ असते. त्यात वैष्णव आखाडे नाशिकला तर १० शैव आखाडे त्र्यंबकला राहतात.
पुढे वाचा... नाशिकमधील वैष्‍णव पंथीय आखाड्याविषयी..