आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाेलिसांसाठी अाैरंगाबादेत हाॅलिडे हाेम - पाेलिस महासंचालक सतीश माथूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘देशात ‘सर्जिकल स्ट्राइक’ कारवाईनंतर हाय अलर्ट आहे. महाराष्ट्र पोलिस पूर्ण क्षमतेने आतंकवाद्यांशी लढा देण्यास सक्षम आहे. राज्याची ‘फोर्स वन’ ही सुरक्षा एजन्सी दहशतवादाचा सामना करण्यासाठी तयार असून केंद्रीय सुरक्षा दलाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात विशेष सर्च ऑपरेशन सुरू आहे,’ अशी माहिती पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना सुटी घालवण्यासाठी लवकरच नाशिकसह औरंगाबाद, पुणे, खंडाळा येथे ‘हॉलिडे होम’ सुरू करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यात सर्वच ठिकाणी एटीएस, अन्य सुरक्षा विभागाकडून विशेष सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. सुरक्षेबाबत कुठलेही दुर्लक्ष नाही. २६/११ च्या हल्ल्यानंतर अत्याधुनिक शस्त्र खरेदी सुरू केली आहे. पोलिस दलात ७० नवीन अत्याधुनिक बोट सज्ज आहे. केंद्रीय सुरक्षा विभाग आणि पोलिस संयुक्त कारवाई करत असल्याचे माथूर म्हणाले.

केंद्र आणि शासनाच्या दोन्ही विभागाच्या समन्वयाने काम सुरू आहे. राज्यात पोलिस कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले दुर्दैवी अाहेत. मात्र, यापेक्षा अधिक महत्त्वाचे पोलिसांचे आरोग्याबाबत शासन गंभीर आहे. पोलिसांनी आरोग्याबाबत सतर्क राहावे. आजार लपवू नये. पोलिसांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र ‘वेल्फेअर फंड’ मंजूर करण्यात आला अाहे, असेही माथूर म्हणाले. सायबर क्राइमच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत अाहे. पोलिस आयुक्तालयात सायबर लॅब स्थापन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांचा दीक्षांत सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.
बातम्या आणखी आहेत...