आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांसाठी प्रथमच 'हॉलिडे होम', नाशिकमध्ये राज्यातील पहिल्याच उपक्रमाचा प्रारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अन्यशहरातील पोलिस कर्मचाऱ्यांना नाशिकमध्ये थांबण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात निवास उपलब्ध व्हावा, यासाठी पोलिस मुख्यालय परिसरात चैतन्य निवासस्थान उभारण्यात आले आहे. हे निवासस्थान पोलिस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी 'हॉलिडे होम' ठरणार आहे.

पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण असल्याने ते कुटुंबीयांनादेखील वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे पोलिसांना आरोग्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. अशा कर्मचाऱ्यांना काही दिवस कुटुंबीयांसमवेत राहता यावे, यासाठी नाशिकपाठोपाठ औरंगाबाद, पुणे, खंडाळा इत्यादी जिल्ह्यात हॉलिडे होम संकल्पना राबविण्यात येणार आहे. नाशिकमधील या पहिल्या प्रकल्पाचा औपचारिक शुभारंभ पोलिस महासंचालक सतीश माथुर यांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडला. त्यांनी चैतन्य निवासस्थानासह पोलिस अधिकाऱ्यांसाठी बनवण्यात येणाऱ्या विश्रांतीगृहाच्या बांधकामाची पाहाणी केली.

चैतन्य निवासस्थानात सध्या १६ खोल्या बांधण्यात आल्या आहेत. या संकल्पनेला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर खोल्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे अाश्वासन माथुर यांनी दिले. पोलिस महासंचालकांनी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमास नाशिकमधून प्रारंभ झाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. पोलिस कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचविण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी सुरू केलेल्या नवनवीन उपक्रमांचे माथूर यांनी कौतुक केले.

कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांनाही लाभ
राज्यातूनन्यायालयीन अथवा तपासकामासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना दिवसाकाठी अवघे ५० रुपये दराने निवासस्थान उपलब्ध करून दिले जाणार आहे. या निवासस्थानाचा पोलिस कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांसाठी हॉलिडे होम म्हणून वापर करणे शक्य असल्याने, राज्यातील पहिले 'हॉलिडे' होम म्हणून हे निवासस्थान सुरू करावे, अशा सूचनाही सतीश माथूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बातम्या आणखी आहेत...