आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील आठवड्यात सुट्यांची मेजवानी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - परतीचा पाऊसही मंदावला असून, सण-उत्सवाच्या वातावरणनिर्मितीस नवरात्रोत्सवाने सुरुवात झाली आहे. त्यातच आता पुढील आठवड्यात शासकीय तीन सुट्या येत असून, २३ ऑक्टोबरची एक रजा टाकल्यास थेट चार दिवसांचीच सुटीची मेजवानी सरकारी बाबूंना मिळणार आहे.

यंदा टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने नियमित वेळेपेक्षाही अधिक वेळ काम करण्याची वेळ कर्मचारी, अधिकाऱ्यांवर येते. अनेकदा रविवार-शनिवार सुटीच्या दिवशीही कामावर जाण्याची वेळ येते. मात्र, उत्सव कालावधीत बहुतांश सुट्या मिळतच असतात. शिवाय सिंहस्थात थकलेली मंडळी आता सुटी घेत असल्यास वरिष्ठांकडूनही त्यास फारसा विरोध करता लागलीच ती मंजूरही केली जात आहे. त्यामुळे नियमित शासकीय सुट्या मिळण्याबाबतही फारशी अडचण नसून, पुढील आठवड्यात २२ ऑक्टोबरला दसरा, २४ ऑक्टोबरला मोहरम आणि चौथा शनिवार, तर २५ ऑक्टोबरला रविवार असल्याने सलग चार दिवस सुट्यांचा आस्वाद घेता येणार आहे.

पर्यटनाचा आनंदही घेण्याची संधी...
बँकांही तीन दिवस सुटीने बंद अाणि शाळांनाही सुट्याच राहणार असल्याने दिवाळीपूर्वीच पर्यटनाचा आनंदही घेण्याची आलेली नामी संधी आता सर्वच सरकारी बाबू साधून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे आताच या मंडळींचे पर्यटनासाठी किंवा कुटुंबासह सहलीचे नियोजन सुरू झाले आहे. अनेकांनी तिकीट बुकिंग, तसेच विविध ठिकाणी जायचे असल्याने तेथील हॉटेलचीही आगाऊ बुकिंग केली जात आहे.