आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिकरोड - उन्हाळी सुट्यांसाठी मध्य रेल्वेने एप्रिल ते जूनदरम्यान हॉलिडे स्पेशल गाड्या सुरू केल्या आहेत. एकूण किती गाड्या सुरू केल्या, त्याची माहितीच नाशिकरोडसारख्या मोठय़ा स्थानकावर उपलब्ध नसल्याने मध्य रेल्वेने प्रवाशांची सोय करूनदेखील स्थानकावर कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. चौकशी केंद्रांवरदेखील प्रवाशांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याने प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वेळापत्रकच नाही
हॉलिडे स्पेशल गाड्या 1 एप्रिलपासून सुरू होणार असताना नाशिकरोड स्थानकाच्या तिकीट विक्री व आरक्षण केंद्रावर या गाड्यांचे वेळापत्रक नाही. चौकशी करणार्या प्रवाशांना कर्मचार्यांकडून तिकीट केंद्रावरून आरक्षण केंद्रावर चौकशीसाठी चकरा माराव्या लागतात. परीक्षा आटोपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुटीत नागरिकांकडून सहल, गावी जाण्याचे नियोजन करण्यात येत असल्याने नियोजित गाड्यांच्या माहितीसाठी मात्र प्रवाशांची धावपळ होत आहे.
स्थानकावर जुने वेळापत्रक
स्थानकावर 1 एप्रिल 2013 पासून मध्य रेल्वेतर्फे सुरू केलेल्या हॉलिडे स्पेशल गाड्यांचे वेळापत्रक लावण्याऐवजी नाशिकरोड स्थानकावर 2011 च्या स्पेशल गाड्यांचे वेळापत्रक लावण्यात आले आहे. यामुळे देशभरातून नाशिकरोड रेल्वे स्थानकावर दाखल होणार्या प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे. स्थानकावरील चौकशी कक्षातही याबाबत माहिती मिळवण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याची तक्रार काही प्रवाशांनी अधिकार्यांकडे केली आहे. वेळापत्रक बदलण्याचे आश्वासन यानंतर अधिकार्यांनी दिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.