आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Holy Cow News In Marathi, Gudhipadva, Divya Marathi, Rugved, Nashik

पुण्य मिळविण्यासाठी चक्क गायीचे डोहाळे जेवण...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - गुढीपाडव्याला आळंदीतील एका महाराजांनी येथील मंदिराला गाय अर्पण केली. ही गाय गर्भवती असल्याचे कळताच मंदिर समितीने तिचे डोहाळे पुरविण्याचा निर्णय घेतला. ठरल्यानुसार रविवारी डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही झाला. पुराणातील कथांनुसार मग हे पुण्य वेचण्यासाठी गावातील महिलांनीही तिचे पूजन करण्यसाठी गर्दी केली होती.
श्री सुंदरराम मंदिरात श्रीराम कथा आनंद सोहळा सुरू आहे. या मंदिराला वि. ज्ञा. चक्रांकित महाराजांनी गाय अर्पण केली.
गाय गर्भवती असल्याचे कळताच मंदिर पुनर्निर्माण समितीने तिच्या डोहाळे जेवणाचा सोपस्कार पार पाडण्याचा निर्णय घेतला. सूत्रसंचालन सोनाली कुलकर्णी यांनी केले. गोमातेचे पूजन चेतन आट्टल, गोशाळेतर्फे अमेय काबरा, अनिल कुलकर्णी (जालना) यांनी केले. माधवीताई उपासणी (साकोरी), सुखदेवबाबा थोरात (वैजापूर), जगदीश अरुणशास्त्री जोशी (त्र्यंबकेश्वर) यांसह गोशाळा पांजरापोळचे अध्यक्ष व विश्वस्त उपस्थित होते.
पुढे वाचा का डोळाळे जेवण...