आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती विजेचे दर युनिटमागे १८ ते ४० पैसे स्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्य सरकारने महावितरणच्या विद्युत बिलाची फेररचना केली असून घरगुती विजेचे दर युनिटमागे १८ ते ४० पैशांनी तर उद्योगांसाठी युनिटमागे १ रुपया ११ पैसे ते १ रुपया ३८ पैसे कमी करून सर्वच घटकांतील ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची घोषणा करत शेजारील राज्यांच्या वीजदराप्रमाणेच भविष्यात कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले आहे.

घरगुती कनेक्शनची ०-१०० युनिटसाठी ४.१६ रुपयांवरून ३.७६ रुपये म्हणजेच ४० पैशांनी, तर १०१ ते ३०० युनिट वापरणार्‍या ग्राहकांसाठी ७.३९ वरून ७.२१ म्हणजे १८ पैसे दरकपात करण्यात आली आहे. शासकीय शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांसाठी (एचटी पब्लिक सर्व्हिस कंटिन्युअस क्षेत्रासाठी) १०.१२ रुपयांवरून ७.६४ रुपये म्हणजे २.५० रुपयांनी कपात झाली आहे. तर एचटी पब्लिक सर्व्हिस नॉन कंटिन्युअससाठी २.८५ रुपयांची युनिटमागे कपात झाली आहे. एचटी इंडस्ट्रीयल कंटिन्युअस- ८.५९ रुपयांवरून ७.२१ रुपये म्हणजे १ रुपया ३८ पैशांनी कमी झाले. नॉन कंटिन्युअस- ७.८२ रुपयांवरून ६.७१ रुपये म्हणजे १.११ रुपयांनी कपात झाली आहे.

कुठलीही सबसिडी न देता सरळ महावितरण, महापारेषण, महाजनको या तिन्ही वीज कंपन्यांशी चर्चा करून एमईआरसीची मंजुरी घेऊनच हे दर कमी करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.
बातम्या आणखी आहेत...