आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मे आरंभीच १२ कोटींची वसुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाच टक्क्यांनंतर आता तीन टक्के सवलत योजनेलाही नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत मंगळवारी एकाच दिवसात घरपट्टीचा ४० लाखांचा भरणा केला आहे. मेच्या प्रारंभीच तब्बल १२ कोटींची वसुली सध्याच्या स्थितीत पालिका प्रशासनाला मोठाच दिलासा देणारी ठरली आहे.

महापालिकेला गेल्या वर्षी घरपट्टी वसुलीत जवळपास ३५ कोटींचा घाटा आला होता. त्यावर नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला खडे बोल सुनावले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपूर्वीच घरपट्टी वसुलीत सुधारणा करण्यासाठी सवलत योजना जाहीर केली. पहिल्या महिन्यात अर्थात एप्रिलमध्ये घरपट्टी भरल्यास पाच टक्के सवलत जाहीर करण्यात आली. त्यात कोटी रुपयांची वसुली झाली. दुसर्‍या महिन्यात तीन टक्के सवलत असून, मेच्या प्रारंभीच आतापर्यंत वसुलीचा आकडा १२ कोटींपर्यंत गेला आहे.

पहिल्याच महिन्यात दहा टक्के वसुली : आर्थिकवर्षाच्या सुरुवातीनंतर पहिल्याच महिन्यात दहा टक्के वसुली झाल्याचे चित्र आहे. घरपट्टीचे सुधारित उद्दिष्ट १३० कोटी असून, १२ कोटींची वसुली झाल्यामुळे महापालिकेला यंदा शंभर टक्के वसुली होण्याची आशा आहे.

घरपट्टीप्रमाणे पाणीपट्टी सवलतीचाही विचार
घरपट्टीसवलत योजनेला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून महापालिकेने पाणीपट्टी योजनेतही सवलत देण्याचा विचार सुरू केला आहे. आयुक्तांकडून हिरवा कंदील मिळाल्यावरच निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.