आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Homeopathy Certificate Course Issue In Maharashtra, Divyamarathi

प्रतीक्षा अध्यादेशाची: होमिओपॅथी प्रमाणपत्र अभ्यासक्रम यंदापासूनच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- होमिओपॅथी डॉक्टरांना आयुर्वेद आणि इलेक्ट्रोपॅथीची प्रॅक्टिस करण्याबरोबरच शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्याचा शासकीय आदेश आरोग्य-विज्ञान विद्यापीठास प्राप्त होताच हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याने यंदाच हा प्रमाणपत्र कोर्स सुरू होण्याची शक्यता आहे.

होमिओपॅथी डॉक्टरांना इतर पॅथींमध्ये प्रॅक्टिस करता येत नसल्याने पदवी घेऊनही कुठलाही उपयोग होत नाही. पदवी घेऊन काय करणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने या संघटनेने थेट हिवाळी अधिवेशनात नागपूर येथेच मोर्चा काढत शासनाकडे परवानगीची मागणी केली. शासनाने थेट परवानगी देता येत नसल्याचे सांगत या डॉक्टरांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करून त्याचा अभ्यास पूर्ण केल्यानंतरच प्रॅक्टिस करण्यास अनुमती देण्याचे निश्चित केले. त्यानुसार होमिओपॅथी कौन्सिलने एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करून तो शासनास सादर केला. त्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यातील डीएचपी अँक्ट 1959 आणि एमएमसी अँक्ट 1965 या दोन्ही कायद्यांतही सुधारणा करण्यात आली असून त्याचा अध्यादेश येणे बाकी आहे. तो येताच विद्यापीठ पुढील कार्यवाही करणार आहे.

500 तासांचा अभ्यासक्रम
होमिओपॅथीच्या डॉक्टरांसाठी सर्टिफिकेट कोर्स इन क्लिनिकल अँड अँप्लाइड फॉरमॅकोलॉजी इन मॉडर्न मेडिसिन हा 500 तासांचा अभ्यासक्रम असेल. त्यानुसार या डॉक्टरांना इतर पॅथीची प्रॅक्टिस करता येणार आहे. त्यातील 200 तास थेअरी व 200 तास क्लिनिकल ट्रेनिंग असेल. या ट्रेनिंगमध्ये शासकीय वैद्यकीय रुग्णालये 100 तासांचे प्रॅक्टिकल त्यात असेल.

आदेश येताच सुरू होणार
अभ्यासक्रम तयार केला आहे. कायद्यातील एक-दोन दुरुस्त्या करून तो सुरू करण्याचे आदेश शासन देईल. याच वर्षी तो देण्यात येणार असल्याने आरोग्य विद्यापीठामार्फत अभ्यासक्रम यंदाच सुरू होण्याची शक्यता आहे.
-डॉ. बाहुबली शाह, प्रशासक, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी