आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोध - चार हजार डॉक्टर रस्त्यावर ; विविध मागण्यांसाठी आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन आणि होमिओपॅथी इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी सुमारे चार हजार डॉक्टरांनी गोल्फ क्लब ते हुतात्मा स्मारक मूक मोर्चा काढला. यानंतर दोन्ही संघटनांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी विलास पाटील यांना दिले.
देशात एकूण सात लाख आयर्वेद व युनानी डॉक्टर असून, त्यांना वैद्यकीय सेवेच्या मुख्य प्रवाहातून वगळण्यात येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये आयएसएम पदवीधारकांचा प्राधान्याने विचार कराण्याची मागणी करण्यात आली. यावेळी निमाचे डॉ. तुषार सूर्यवंशी, डॉ. देवेंद्र बच्छाव, डॉ. अनिल निकम, डॉ. प्रतिभा औंधकर, डॉ. समीर लासुरे, डॉ. विशाल घोलप, डॉ. बी. बी. देशमुख, डॉ. मनीष जोशी, डॉ. दीपक पाटील, डॉ. शेखर मगर, डॉ. सुनील जाधव उपस्थित होते .
होमिओपॅथी वैद्यकीय संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांना अँलोपॅथीचा कंडेन्स कोर्स देण्यात यावा. होमिओपॅथीसाठी स्वतंत्र संचालनालय असावे. होमिओपॅथी व्यावसायिकांना सरकारी सेवेत सामावून घेण्याची मागणी यावेळी केली. होमिओपॅथी डॉक्टर तीन दिवसांचा बंद पाळणार आहेत. होमिओपॅथी संघटनेचे डॉ. भालचंद्र ठाकरे, डॉ. अरविंद पगार, डॉ. स्वप्निल खैरनार, डॉ. संदीप मंडलेचा, डॉ. संजय रकिबे, डॉ. संजय दाभाडकर, डॉ. भगवान पगार, डॉ. रोहिदास भदाणे, डॉ. आसिफ शेख, डॉ. अनिल चोरडिया हे यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा - जिल्हाधिकारी व बी. ए. एम. एस. आणि बी. यू. एम. एस. पदवीधर यांच्यात चर्चा झाली. यावेळी बी. ए. एम. एस व बी. यू. एम. एस या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे देणे दुकानदारांना बंधनकारक आहे. तत्कालीन अन्न व औषध आयुक्त महेश झगडे यांनी इसेन्शिअल कमोडिटी अँक्टअन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, असे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सांगतिले.