आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाेर्डिंगचा दंड वसूल न झाल्याने १० काेटींवर पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेने ठरवून दिलेल्या जागांव्यतिरिक्त शहरात माेठ्या प्रमाणात जाहिरात फलक हाेर्डिंग्ज लावण्यात येतात. हे हाेर्डिंग्ज बेकायदेशीर असल्यामुळे त्यातून काेणताही महसूल मिळत नाही. त्यामुळे महापालिकेला सुमारे १० काेटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागत अाहे. अधिकृत हाेर्डिंग्जच्या जागा वाढवून अनधिकृत हाेर्डिंग्ज लावणाऱ्यांकडून दंड वसूल केल्यास महापालिकेच्या तिजाेरीतील खडखडाटाचा अावाज निश्चितच कमी हाेऊ शकेल.
महापालिकेच्या जागेवरील खासगी जागेतील अशा दाेन प्रकारे महापालिकेला जाहिरात होर्डिंग्जमधून उत्पन्न प्राप्त होते. मात्र, हे दर अन्य शहरांतील दरांच्या तुलनेने अत्यंत कमी असल्याने महापालिकेला माेठ्या उत्पन्नाला मुकावे लागत अाहे. दुसरीकडे शहरात अनधिकृतपणे हाेर्डिंग्ज लावणाऱ्यांवरही प्रशासन कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे वर्षाला सुमारे १० काेटींचे नुकसान महापालिकेला सहन करावे लागत अाहे. शहरात एसटी महामंडळ, राज्यमार्ग, महामार्ग, पाटबंधारे विभाग यांच्यासह सरकारी मालकीच्या जागेवर जाहिरात लावण्याची परवानगी त्या-त्या विभागाकडून दिली जाते. मात्र संबंधित जाहिरातधारकांकडून महापालिकेचा कर वसूल करणे अावश्यक अाहे. मात्र, असा कर फारसा वसूलच हाेत नसल्याचे निदर्शनास येते.
{मुंबई-पुण्याच्या धर्तीवर जाहिरात कर लावण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला हाेता. त्यातून ४० कोटीच उत्पन्न मिळेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले असताना या ठरावाकडे पाठ फिरविल्याने पालिकेला या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे.
{अनधिकृत हाेर्डिंग्जबाबत महापालिकेकडे पुरेशी माहितीच नसते. त्यामुळे संबंधितांकडून दंड वसूल केला जात नाही.
{शहरातील रिक्षा, टॅक्सी बसवर लावण्यात येणाऱ्या जाहिराती खासगी जागांवरील जाहिरात कर हा जाहिरात एजन्सी जागामालक यांच्यात झालेल्या करारातील रकमेवर लागू करावा, असा महत्त्वपूर्ण निर्णयदेखील घेण्यात आला हाेता.
{गेल्या वर्षी महासभेतच अाधीच्या १४.५० रुपयांऐवजी नवीन जाहिरात कर १२५ रुपये प्रतिचौरस मीटर घेण्याचा निर्णय झाला. अशाप्रकारे जाहिरात करात भरघोस वाढ केल्याने पालिकेला तब्बल ४५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे या डॉकेटमध्ये म्हटले होते.
{बहुतांश हाेर्डिंग्ज लावणारे राजकीय पुढारीच असतात. प्रशासनाने संबंधितांवर कारवाईचा प्रयत्न केल्यास पुढारी मंडळी दबाव टाकतात.
{दाेन वर्षांपूर्वी एका संस्थच्या पाहणीत शहरात साडेचार हजार अनधिकृत होर्डिंग्ज उभे राहिल्याचा दावा करण्यात आला हाेता.
{दुभाजकांमध्येही अनधिकृत जाहिरात फलक झळकावले जातात.
बातम्या आणखी आहेत...