आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hospital News In Marathi, Daughter's Health In Danger For Wrong Medication At Nashik

‘चुकीच्या औषधोपचाराने मुलीचे आरोग्य धोक्यात’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आडगाव येथील मविप्र वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केलेल्या मुलीची प्रकृती सुधारण्याऐवजी खालावल्यानंतर विनापरवानगी शस्त्रक्रिया करीत तिला चिंताजनक स्थितीत घरी सोडून दिल्याचा आरोप भारत कटारिया यांनी केला आहे. यासंदर्भात, पोलिस आयुक्त व आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
कटारियांच्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी जया (वय 14) ही आजारी झाल्याने जानेवारीमध्ये तिला या रुग्णालयात दाखल केले होते. महिनाभराच्या उपचारानंतरही प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला बळजबरीने घरी पाठवून दिले. मुंबईत केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी आधीच्या रुग्णालयात चुकीच्या औषधोपचाराने तिची किडनी निकामी झाल्याचे सांगितले. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात विचारणा केल्यावर हाकलून देण्यात आले. आडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव महाजन यांनी अर्ज दाखल करून घेतला आहे.
औषधोपचार योग्यच
कटारियांच्या तक्रारीनुसार पोलिसांचे पत्र रुग्णालयास मिळाले. संबंधित डॉक्टरांचे औषधोपचार योग्य असून, मुलीला आधीपासूनच किडनीचा त्रास होता. कुटुंबीयांच्या मागणीनुसारच तिला घरी सोडले. कटारियांचे आरोप निराधार आहेत. डॉ. मृणाल पाटील, अधिष्ठाता, मविप्र वैद्यकीय महाविद्यालय