आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी हीरो’ प्रशांत खांडरेंचा पोलिस महासंचालकांच्या हस्ते गौरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दोनठिकाणी दरोडा टाकून पळणाऱ्या पुणे येथील कुख्यात टोळीच्या गुंडास पाठलाग करून पकडणारा पोलिस मित्र प्रशांत खांडरे यांचा पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते सत्कार करण्यात अाला. शनिवारी (दि. ११) मध्यरात्री बोधलेनगर येथे घडलेल्या या थरारक प्रकाराचे ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. ‘दिव्य मराठी’च्या या वृत्ताचीही दीक्षित यांनी दखल घेत कौतुक केले. या वृत्तामुळे पोलिस दलाची प्रतिमा उंचावली असून, ‘दिव्य मराठी’चे हे वृत्त ‘पोलिस मित्र’ निर्माण होण्यासाठी प्रेरणादायी ठरले, असे प्रतिपादन दीक्षित यांनी केलेे.
पोलिस महासंचालक त्र्यंबकेश्वर येथे खासगी दौऱ्यावर आले असून, शनिवारी सकाळी पोलिस आयुक्तालयात छोटेखानी समारंभात त्यांच्या हस्ते पाेलिस मित्र खांडरेंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, उपआयुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, अतुल झेंडे, सचिन गोरे, डॉ. राजू भुजबळ यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

‘दिव्य मराठी’मुळेच ओळख
^‘दिव्यमराठी’मध्येअालेल्या बातमीमुळेच मी शहरात ‘पोलिस मित्र’ म्हणून प्रसिद्ध झालो. पोलिस महासंचालकांच्या हस्ते सत्कार झाल्याने भारावून गेलो. पुढेही ‘पोलिस मित्र’ म्हणून पोलिस दल आणि समाजाची सेवा करणार आहे. -प्रशांत खांडरे, पोलिस मित्र
पाेलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पाेलिस मित्र प्रशांत खांडरे यांचा सत्कार केला. समवेत पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन.
बातम्या आणखी आहेत...