आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णसेवेची मदार बंद यंत्रांवरच, शासनाकडे पाठपुरावा सुरू...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्याचार वर्षांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयामधील सिटीस्कॅन यंत्रणा बंद आहे. यामुळे याठिकाणी येणाऱ्या रुग्णांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जावे लागत अाहे. गरीब गरजू रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या अशा महत्त्वपूर्ण यंत्रणाच बंद असल्याने रुग्णांची माेठी गैरसाेय हाेत अाहे. याबाबत रुग्णांच्या असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ‘डी.बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत धक्कादायक वास्तव समाेर अाले. जुलै २०११ पासून ही यंत्रणा बंद पडली आहे. १२ वर्षांपूर्वी सुमारे दोन कोटी रुपयांची सिटीस्कॅन यंत्रणा बसवण्या अाली हाेती. सद्यस्थितीत तिची वयोमर्यादा संपल्याने ती निकामी झाली आहे. नवीन यंत्रणेबाबतचा प्रस्ताव शासनदरबारी धूळखात पडून असल्याने अद्यापही प्रतीक्षा कायम आहे. यासाठी रोज किमान सात ते आठ रुग्ण या ठिकाणी येत असतात. मात्र, बंद यंत्रणेअभावी त्यांना शालिमार येथील शासकीय संदर्भ सेवा रुग्णालयात पाठविले जाते. काही रुग्णांना पदरमाेड करीत खासगी सेंटर्समध्येही जावे लागत असल्याचे दिसून अाले.

रुग्णांची आर्थिक पिळवणूक
संदर्भसेवा रुग्णालयात दररोज सुमारे १५ रुग्णांचे सिटीस्कॅन केले जाते. गेल्या दोन वर्षांत सुमारे सहा हजार रुग्णांनी येथे सिटीस्कॅन करून घेतले आहे. यासाठी संदर्भमध्ये एका पेशंटकडून पोटाच्या सिटीस्कॅनसाठी ७५० रुपये, तर डोक्याच्या सिटीस्कॅनसाठी ५०० रुपये आकारले जातात, तर खासगी ठिकाणी यासाठी अडीच हजार ते साधारणत: सात हजार रुपये आकारले जातात. सिव्हिलमधील या काेलमडलेल्या व्यवस्थेचा अार्थिक फटका गरीब रुग्णांना बसत अाहे.

अर्धाडझन यंत्रणा बंद
सिटीस्कॅनयंत्रणेबरोबरच अर्धा डझनपेक्षा अधिक यंत्रणांची अशीच अवस्था आहे. एक्स-रे, व्हेंटिलेटर, ऑटोक्लाऊड, बेबी वॉर्मर, सोनोग्राफी आदी यंत्रणांत वारंवार बिघाड हाेत असल्यानेदेखील रुग्णांना वारंवार खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. अनेकदा रुग्णांना पर्यायी व्यवस्था म्हणून अन्य रुग्णालयांत पाठविले जात असल्याचेदेखील ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले.

पालिका रुग्णालयांतही अाेरड
महापालिकेच्याडॉ. झाकीर हुसेन रुग्णालयासह इंदिरा गांधी रुग्णालयातील एक्स-रे मशीन गेल्या दोन महिन्यांपासून बंद पडलेले आहे. हे मशीन दुरुस्त करण्याची मागणी काही रुग्णांनी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली असता ‘दुरुस्तीच्या कामांना वेळ लागतोच’, असे मोघम उत्तर संबंधितांकडून देण्यात आले. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील अनेक महत्त्वाच्या यंत्रणाही गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. सिंहस्थात या यंत्रणा कार्यान्वित होतील, अशी आश्वासने यापूर्वी अनेकदा देण्यात अाली. मात्र, अद्यापदेखील या यंत्रणांची दुरुस्ती करण्यात अाली नसल्याने रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
दिवसभर झाली वणवण...
मीनाशकात सिंहस्थाच्या बंदोबस्तासाठी अालो अाहे. अचानक फिट आल्याने मी शासकीय रुग्णालयात आलो. मात्र, मला विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यामुळे माझी गैरसाेय झाली. त्यानंतर दिवसभर रांगेत उभे राहून सिटीस्कॅन करून घेतले. मात्र, जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन दाखवण्यासाठी अालाे असता, याठिकाणी संबंधित वैद्यकीय अधिकारीच उपस्थित नव्हते. प्रशासनाच्या या भाेंगळ कारभाराचा फटका माझ्यासारख्या असंख्य रुग्णांना बसत अाहे. -त्रस्त पोलिस कर्मचारी

खासगी सेंटरमध्ये केले सिटीस्कॅन...
जिल्हाशासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलाे असता सीटी स्कॅन करण्याचा सल्ला येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आला. त्यांनी संदर्भ सेवा रुग्णालयाचे नाव सूचविले. पण, याठिकाणी सिटीस्कॅन केल्यावर रुग्णालयात सिटीस्कॅनसाठी अालेल्या रुग्णांची गर्दीने हताश झालाे. अखेर नाईलाजास्तव जवळील एका खासगी सेंटरमधून अधिक पैसे खर्च करून सिटीस्कॅन करून घेतले. -दीपक पवार, रुग्ण

शस्त्रक्रिया विभागातील एसी बंदच
सिंहस्थकाळात लाखो भाविकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयासह शहरातील बिटको रुग्णालय, तसेच इंदिरा गांधी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमधील वातानुकूलित यंत्रणा गेल्या तीन महिन्यांपासून बंदच अाहे. त्यामुळे या रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येते. सिंहस्थ काळात तरी ही यंत्रणा योग्यरीत्या सुरू करण्यात यावी, अशी रुग्णांची अाेरड अाजही कायम आहे.

नवीन यंत्रणेबाबतच्या प्रस्तावाकडे दुर्लक्षच
रुग्णालयप्रशासनाकडून रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकरिता शासनाकडे यंत्र खरेदीचा प्रस्ताव पाठविलेला आहे. हा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या संचालकांनी मंजूर केल्यानंतर शासनाकडे प्रस्तावित करण्यात आला. विशेष म्हणजे, प्रस्ताव पाठविण्यापूर्वी ‘गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेली सिटीस्कॅन यंत्रणा केव्हाही बंद पडू शकते', असे शासनाच्या निर्दशनास आणून दिले होते; परंतु तरीदेखील संबंधितांचे सिंहस्थ काळातदेखील या महत्त्वपूर्ण प्रस्तावाकडे दुर्लक्षच आहे.

या समस्यांमुळे रुग्ण हैराण
‘डी.बी. स्टार’ने रुग्णालयाची पाहणी केली असता रुग्णालयातील शौचालयांची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली दिसून अाली. चेंबर तुंबलेले असल्याने माेठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली हाेती. रुग्णालयातील काही विभागांत महिलांसाठी स्वतंत्र शाैचालयाची सुविधा नसल्याने महिलांना इतर विभागात जावे लागत असल्याचेही दिसून अाले. तसेच, पिण्याचे पाणी असलेल्या ठिकाणीदेखील घाणीचे साम्राज्य हाेते. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या अाराेग्याचा प्रश्न उपस्थित हाेताे.

०५ लाख रु. एक्स-रे
०१ लाख रु. सोनोग्राफी
०१ लाख रु. ऑटोक्लाऊड (निर्जंतुकीकरण)
४० हजार रु. बेबी वॉर्मर
०२ लाख रु. व्हेंटिलेटर
०२ कोटी रु. सिटीस्कॅन मशीन

जिल्हा शासकीय रुग्णालयात १२ वर्षांपूर्वी केलेली खरेदी अशी
एक्स-रे मशीनची पूर्णत: वाताहत झाल्याने ती अशाप्रकारे धूळखात पडून अाहे. रुग्णालयाला नवीन एक्स-रे मशीन मिळाली असून, अद्याप मात्र तिचा वापर हाेत नसल्याचे दिसून अाले.
सिव्हिलमधील साेनाेग्राफी, सिटीस्कॅन विभाग यंत्रणेअभावी बंद असल्याने या विभागाचे नावही असे काढण्यात अाले अाहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन, साेनाेग्राफी इतर यंत्रणा बंद असल्याने संदर्भ सेवा रुग्णालयात रुग्णांची अशाप्रकारे गर्दी हाेत असल्याचे दिसून येते.
अत्यंत महत्त्वपूर्ण खर्चिक मानली जाणारी सिटीस्कॅनसारखी सुविधा माेफत देण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात यंत्रणा कार्यान्वित करण्यात अाली खरी. मात्र, गेल्या चार वर्षांपासून वारंवार बिघाड हाेत असल्याने रुग्णांना पदरमाेड करीत संदर्भ सेवा रुग्णालयात, तसेच अन्य खासगी रुग्णालयांत जावे लागत अाहे. एवढेच नव्हे, तर अाजघडीला एक्स-रे, व्हेंटिलेटर, ऑटोक्लाऊड, बेबी वॉर्मर, सोनोग्राफी आदी महत्त्वपूर्ण यंत्रेही बंद असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले आहे. सिंहस्थादरम्यान येणारे साधू, भाविक पर्यटकांचे आरोग्य सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी शासकीय रुग्णालयाच्या खांद्यावर असतानादेखील प्रशासनाकडून कुठलीही सक्षम उपाययाेजना केली जात नसल्याने नागरिक रुग्णांची अाराेग्य सुविधांबाबतची अाेरड अाजही कायम अाहे.
{जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून सिटीस्कॅन यंत्रणा बंद असल्यामुळे रुग्णांची माेठ्या प्रमाणावर गैरसाेय हाेत आहे, याबाबत माहिती आहे का?

- सिंहस्थात रुग्णांना तत्काळ सिटीस्कॅनची गरज पडली तर काय करणार?
सिंहस्थातसिटीस्कॅन इतर महत्त्वाच्या तपासणीची गरज पडल्यास शासकीय रुग्णालयामार्फतच या तपासण्या खासगी रुग्णालयातून करण्याचे नियोजिले आहे.

- जिल्हाशासकीय रुग्णालयात सिटी स्कॅनसह इतर काही महत्त्वाच्या यंत्रणा बंद आहेत. त्याचे काय?
शासकीयरुग्णालयात सिटीस्कॅन इतर महत्त्वाच्या यंत्रणा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. त्यासाठी पाठपुरावाही सुरू आहे.