आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीव्र उन्हाच्या तडाख्याने हाेतेय शहरवासीयांच्या अंगाची लाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गतआठवडा ढगाळ हवामान आणि बेमोसमी पावसाचा असल्याने कमाल तपमान हे २८ अंश सेल्सिअसपर्यंत आले होते, तर िकमान तपमान हे १६ अंश सेल्सिअसपर्यंत आले होते. त्यामुळे नागरिकांनी रात्री सुखद गारव्याचा अनुभव घेतला. मात्र, शनिवारी उन्हाची तीव्रता वाढल्याने कमाल तपमान थेट ३८ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. त्यामुळे शहरवासीयांना उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. सध्या आकाश निरभ्र आणि कोरडे झाल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे तपमानात वाढ झाल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. डांबरी रस्त्यांवरून प्रवास करताना उन्हाच्या झळा लागत असल्याने शहरवासीयांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.