आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉटेलमधील सिलिंडर पेटल्याने आग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कॉलेजरोडवरील एका हॉटलमध्ये गॅस सिलिंडर पेटल्याने परिसरात पळापळ झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच ही आग विझवल्याने अनर्थ टळला. इमारतीमधील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. हॉटेल बंद करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

कॉलेजरोडवरील डी. जे. हौसिंग सोसायटीमधील हॉटेल श्रीकृष्ण येथे सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. आग वाढत गेल्याने कर्मचार्‍यांनी हॉटेलमधून पळ काढला. ही पळापळ पाहून सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीती पसरली व त्यांचीही धावपळ झाली. यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाल्याने ही आग लवकर विझवण्यात आली. उशीर झाला असता तर मोठा स्फोट होण्याची शक्यता जवानांनी व्यक्त केली. या घटनेमुळे सोसायटीची सुरक्षितता धोक्यात आली असल्याचे सांगत या इमारतीतील अनधिकृत हॉटेल बंद करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

या परिसरातील तीन हॉटेलमुळे रहिवाशांच्या सुरक्षेसह आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अरविंद अमृतकर, डॉ. राहुल पगार, नितीन काळे, विजय वाणी, संजय वाणी आदी सदस्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.
सुरक्षेचा प्रश्न गंभीर
४हॉटेलच्या अनधिकृत भट्टीमुळे आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- संजय दुसे, सचिव, डी. जे. हौसिंग सोसायटी