आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडीतील संशयित तासाभरात जेरबंद, महात्मानगर परिसरात भरदिवसा घरफोडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महात्मानगर परिसरात रविवारी भरदिवसा घरफाेडीची घटना घडल्यानंतर अवघ्या तासाभरात गंगापूर पाेलिसांनी अट्टल घरफोड्यास मुद्देमालासह या परिसरातच जेरबंद केले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी गंगापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत सावजी यांच्या फ्लॅटमध्ये (रा. अपार अपार्टमेंट, महात्मानगर)सकाळी चोरी झाली. सावजींनी कळविल्यानुसार गंगापूर पोलिसांनी गस्त सुरू केली. एका बसस्थानकात किरण ऊर्फ रतन गुजर पाटील (रा. नांदगाव) या संशयिताची चाैकशी केली असता त्याच्या खिशात सोन्याचे नाणे आढळले. याबाबत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. तो सराईत घरफोड्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक निरीक्षक सुरेश पाडवी यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.