आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • House Owner\'s Son Arrested In Case Of Mother Son Murder

दुहेरी हत्याकांडाची उकल, शारीरिक संबंधास नकार दिल्याने हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पल्लवी संसारे त्यांचा मुलगा विशाल. - Divya Marathi
पल्लवी संसारे त्यांचा मुलगा विशाल.
नाशिक - श्रमिकनगर येथील मायलेकाच्या खुनाचा उलगडा २४ तासांत करण्यात सातपूर पोलिसांना यश आले असून, घरमालकाच्या मुलानेच महिलेकडे जबरदस्तीने शरीरसुखाची मागणी केली असता त्यास त्यास नकार दिल्यानेच या महिलेसह तिच्या चिमुकल्या मुलाची निर्दयपणी हत्या केल्याचे उघडकीस अाले अाहे. याप्रकरणी पाेलिसांनी संशयित रामदास रंगनाथ शिंदे यास मंगळवारी एक्सलो पॉइंट येथील एका हॉटेलमधून अटक केली.

पाेलिस उपअायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अायुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक मनाेज करंजे यांनी पत्रकार परिषद ही माहिती दिली. श्रमिकनगर, शिवाजीनगर कार्बन नाक्यामागे भाडेतत्त्वाने राहणाऱ्या पल्लवी कचरू संसारे (३४) आणि मुलगा विशाल संसारे (६) या मायलेकांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह सोमवारी सकाळी अाढळून आले होते. अनैतिक संबंध अथवा अतिप्रसंग केल्याच्या घटनेतून ही घटना घडल्याची चर्चा सुरू होती. घरमालकाचा मुलगा संशयित रामदास रंगनाथ शिंदे (२७) हा घटनेनंतर अचानक गायब झाल्याने पाेलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. घटनेच्या अादल्या दिवशी रात्रीच पल्लवी माहेरून परतल्या हाेत्या. तर संशयिताची पत्नी म्हसरूळ येथे माहेरी गेलेली होती. कचरू संसारे, पत्नी पल्लवी मुलगा हे तिघेही रविवारी घरी असताना पती रात्रपाळीला कामावर गेले. याच संधीचा फायदा घेऊन संशयित रामदासने घरातील प्रवेशद्वाराने संसारेंच्या घरात प्रवेश करून पल्लवीकडे शरीरसुखाची मागणी केली असता पल्लवीने त्यास नकार देत अारडाअाेरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयिताने चाकूचा धाक दाखवून तिला विवस्त्र केले. दाेघांमध्ये झटापट हाेताच त्या अावाजाने मुलगा विशाल झाेपेतून उठल्याने सर्वप्रथम त्याच्यावर संशयिताने चाकूने वार केला. पल्लवीने मुलाला वाचविण्यासाठी चाकूचे वार स्वत:च्या अंगावर घेतले. परंतु, शरीरसुखाच्या धुंदीने पछाडलेल्या रामदासने पल्लवी चिमुकल्याच्या सर्वांगावर १५ ते २० वार करीत रक्तबंबाळ केले. मायलेक रक्ताच्या थाराेळ्यात पडल्याचे बघून संशयिताने मुख्य प्रवेशद्वाराची बाहेरून कडी लावून काेणालाही संशय येऊ नये, यासाठी घराला बाहेरून कुलूप अाणि अातून कडी लावून पळ काढला.

पुढे वाचा, गुन्ह्याची कबुली, रहिवाशांमध्ये भीती