आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरपट्टी, पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - विभागातील घरपट्टी पाणीपट्टीच्या १०० टक्के वसुलीचे आदेश काढून महापालिका प्रशासाने कडक पावले उचलली आहेत. घरपट्टी पाणीपट्टी भरणाऱ्यांविरोधात थेट जप्तीची कारवाई होणार असून, यासंदर्भात महापालिका उपायुक्त रोहिदास दोपूळकर यांनी बुधवारी सिडको विभागीय कार्यालयाला भेट देऊन वरील आदेश दिले.
उपायुक्त रोहिदास दोपूळकर यांनी घरपट्टी पाणीपट्टी वसुली विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची सकाळी तातडीची बैठक घेऊन त्यात महापालिकेच्या उद्दिष्टांची माहिती दिली. सिडको विभागाचे एकूण उत्पन्न, त्यातील होणारी वसुली होणारी वसुली याबाबत चर्चा केली. वसुलीचे ध्येय साध्य करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले. यावेळी वसुली निरीक्षक मनोज संगमेरे, यू. के. सरोदे, एस. एम. लोखंडे, डी. ए. निकम, डी. एम. शेलार, आर. डी. मौले, व्ही. बी. देवरे, जे. बी. टिळे, एस. टी. काटे, ए. जे. माळोदे, आर. आर. वळवी आदी उपस्थित होते.

..अशी होईल कारवाई : नागरिकांना घरपट्टी पाणीपट्टीची बिले पाठविण्यात आली आहेत. ज्यांना मिळाली नाहीत, त्यांना पुन्हा देण्यात येणार आहेत. बिले भरणाऱ्यांना प्रथम सूचनापत्र, त्यानंतर नोटीस तरीही बिल भरल्यास जप्ती केली जाणार आहे.