आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युथ कट्टा: विचारपूर्वक निवडा एमबीए संस्था, वाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरकारच्या तंत्रशिक्षण विभागाने एमबीएची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया नुकतीच सुरू केली असून अाता प्रवेशासाठी इच्छुक मुलांची लगबग सुरू होईल. गेली काही वर्षे असे निदर्शनास येते आहे की, विद्यार्थ्यांची संख्या खाली येत आहे ते जागरूक होत आहेत. असे आढळले अाहे की, विद्यार्थी चौकशीला आले की, प्रथम प्लेसमेंटबद्दल ताे चौकशी करतो. त्यामध्येही इथेे किती पॅकेज मिळेल, याची ताे चौकशी करतो. मग संस्थेच्या बाकीच्या गोष्टींची चौकशी करतो. एका एमबीए संस्थेचा एक संचालक म्हणून विचार करताना असे वाटते की, आपण इथे एखादी एमबीए इन्स्टिट्यूट चालवत आहोत, की प्लेसमेंट कंपनी?

शुल्क भरूनप्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला नोकरीची हमी हवी असणे स्वभाविक आहे. त्याने प्लेसमेंटला महत्त्व दिले तर तो सिस्टिमचा दोष आहे. मात्र, प्लेसमेंटच्या निकषावर इन्स्टिट्यूट निवडावी का? की जाहिरातीत दाखवलेल्या इमारती, सवलती, संस्थेचे नाव पाहून निर्णय घ्यावा, की अजून काही तरी महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष द्यावे?

जाहिराती काळजीपूर्वक पहिल्यास दिसते की, नको त्या गोष्टींवर भर असतो. प्राध्यापकांविषयी, विषयाच्या तयारी करून घेण्याविषयी, अवांतर ज्ञान देण्याबद्दल, सर्वांगीण प्रगतीबद्दल त्या बोलत नाही. या सर्व गोष्टी रिक्रूटर संभाव्य उमेदवारात पाहत असतो. त्यांच्या मते संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण, समस्या सोडविण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती या गुणांची उणीव दिसते. त्यामुळेच एमबीएच्या विद्यार्थ्यांबद्दल भ्रमनिरास झाला आहे. त्यांच्या मते १०% एमबीए विद्यार्थी व्यवस्थापनास लायक असतात. ९०% जणांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळत नाही विद्यार्थ्यांना संस्थेबद्दल विश्वास राहत नाही.

किती प्राध्यापकांनी उद्योग जगतात कोणत्या जागी काम केले आहे, अनुभव किती, त्यांचे किती रिसर्च पेपर आहेत, विद्यापीठाच्या योजनांचा उपयोग करून किती रिसर्च केला आहे? त्यांच्या विषयावर किती हुकूमत आहे? यातल्या काही गोष्टी वेबसाइटवर असतात, काही माहीत करून घ्याव्या लागतात. चांगले प्राध्यापक संस्थेचा भक्कम पाया असतो. त्यांनी जे ज्ञान दिले त्यावरच चांगली प्लेसमेंट मिळणार की नाही ते ठरते.

पुढे वाचा... अनेक संस्थांमध्ये अनेकदा परीक्षेवर नजर ठेवून शिकवले जाते घोकंपट्टी करून वा गाइड वापरून चांगल्या निकालाची जाहिरात केली जाते.