आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीच्या परीक्षा धोक्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे नऊ महिन्यांनंतरही मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या परीक्षांवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बारावीच्या मौखिक व लेखी परीक्षा धोक्यात आल्या आहेत. दरम्यान, सोमवारी (दि. 30) राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

याआधी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्काराचे आंदोलन छेडण्यात आले होते. 13 मार्च 2013 रोजी हे आंदोलन मागे घेतेवेळी शिक्षणमंत्र्यांनी बहुसंख्य मागण्या मान्य केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर या मागण्यांसाठी 3 डिसेंबरला मुंबईत धरणे आंदोलन झाले. 18 डिसेंबरला नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनात याबाबत मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना आठवण करून देण्यात आली. त्यानंतरही निर्णय न झाल्याने सोमवारी (दि. 30) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. या उपोषणाची दखल न घेतल्यास 20 जानेवारीला शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर उपोषण केले जाणार आहे, तसेच 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या मौखिक परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे.