आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावित्रीच्या लेकरांची कामगिरी उज्ज्वल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील विविध शाळांनी दहावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली. शाळांच्या उत्कृष्ट शैक्षणिक नियोजनाला विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची जोड लाभल्याने अनेक शाळांनी शतप्रतिशत निकालाचे उद्दिष्ट गाठले. अनेक विद्यार्थ्यांनी विविध विषयांत 100 टक्के गुण मिळवत गुणवत्ता सिद्ध केली. विविध शाळांचा निकाल असा-
विद्या प्रबोधिनी प्रशाला
विद्या प्रबोधिनी प्रशाळेचा 99 टक्के निकाल लागला. तेजल भावसार (96.40) शाळेत प्रथम आली. गणितात तेजल भावसार, गौरव भंदुरे व जास्वंदी खोडे, तर संस्कृतमध्ये निखिल पाटील याने 100 पैकी 100 गुण मिळविले. संस्थेचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी, अध्यक्ष दिवाकर कुलकर्णी, कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, मुख्याध्यापिका शुभांगी पाटील व विजया पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
दि न्यू एज्युकेशन संस्था
दि न्यू एज्युकेशन संस्थेच्या शाळांनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. संस्थेच्या डी. डी. बिटको बॉईज हायस्कूलचा 98.06 टक्के व वाय. डी. बिटको हायस्कूलचा निकाल 99.63 टक्के लागला. संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वैशंपायन, कार्याध्यक्ष प्रकाश वैशंपायन, सचिव एस. के. जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
काकासाहेब देशमुख विद्यालय
पंचवटीतील काकासाहेब देशमुख शाळेचा निकाल 70.27 टक्के लागला. त्यात पंकज साहेबराव घोटेकर प्रथम आला. मुख्याध्यापिका पुष्पा गायकवाड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय
केबीएच विद्यालयाचा निकाल 84.31 टक्के लागला. रूपेश उचित (90), पवन जाधव (85.20), नीलेश राठोड (82.40), श्रावण खरादे (82.40), विलास आहेर (81.40), ब्रह्मानंद होनमाने (80.60) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. संस्थेचे प्रशांत हिरे, मुख्याध्यापक एम. एल. पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय
रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाचा निकाल 92.36 टक्के लागला. कावेरी काळे (84), सुनंदा काऊतकर (80.80), मनीषा देशमुख (79) यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार झाला.