आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Human Resource Development Syllabus Issue At Nashik

कुशल मनुष्यबळ विकास अभ्यासक्रम तयार होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ विकसित व्हावे, यासाठी अद्ययावत अभ्यासक्रम तयार होणार आहे, त्यासाठी उद्योगांचा प्रत्यक्ष अभ्यास केला जाणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयीन कुशल मनुष्यबळ विकास विभागाचे सल्लागार तन्मया नायक आणि हेमेंद्र कोठारी फाउंडेशनचे किरण इनामदार यांनी केले. अंबड इंडस्ट्रीज अँण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करताना रविवारी ते बोलत होते.

आयमाच्या सहकार्याने यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे पंतप्रधान कार्यालयाच्या मदतीने प्रशिक्षण संस्था उभी केली जाईल, असे तन्मया नायक यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान कार्यालयीन कुशल मनुष्यबळ विकास विभाग आणि हेमेंद्र कोठारी फाउंडेशन यांच्या सहकार्याने अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतींमधील शंभर कंपन्यांना भेटी देऊन कुठल्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे, हे लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे.

सन 2030चे ध्येय
सन 2030 पर्यंत भारतात ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग, बांधकाम, टेलिकम्युनिकेशन, सीएनसी, सरफेस, ट्रिटमेंट, प्लेटिंग, कोटिंग, हिट्रिटमेंट, प्लास्टिक्स, हॉस्पिटॅलिटी, मशिन्स, प्रेस, टर्निंग या उद्योगांसाठी जवळपास 5 कोटी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आयटीआयसारख्या प्रशिक्षण संस्थांचे व उद्योजकीय संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे.