आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hundred Hour Continuous Walking Record Mention By Ranjan

शंभर तास चालण्याच्या विश्वविक्रमाला गवसणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक मधील बांधकाम व्यावसायिक रंजय बच्चन त्रिवेदी (४७) यांनी सलग चार दिवसांहून अधिक म्हणजे तब्बल १०० तास सतत चालण्याच्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. रंजय यांनी हा विक्रमी वॉक पूर्ण करताच उपस्थित जॉगर्स तसेच मान्यवरांनी त्यांना उचलून घेत तसेच शुभेच्छा आणि पुष्पगुच्छांचा वर्षाव करीत त्यांचे अभिनंदन केले. या विक्रमाची नोंद वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये करण्यात येणार असून, नाशिकच्या शिरपेचात त्यामुळे अजून एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

रंजय त्रिवेदी यांनी ३१ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वाजता चालण्यास प्रारंभ करून जानेवारीला रात्री १०.३० वाजता १०० तास पूर्ण करण्याचा संकल्प केला होता. दुसऱ्या दिवशी आणि रात्रीदेखील त्यांची चाल अखंडपणे सुरूच ठेवली होती. विशेष म्हणजे, जानेवारीला सकाळी थोडा काळ पाऊस पडल्यावरही त्रिवेदी यांनी त्यांचे चालणे अव्याहतपणे सुरूच ठेवले होते. त्रिवेदी यांना सोबत करण्यासाठी महानगरातील अनेक जॉगर्सनी त्यांच्या क्षमतेनुसार त्रिवेदी यांच्यासमवेत वेगवेगळ्या वेळी फेऱ्या मारल्या. उपमहापाैर गुरुमित बग्गा, हरीश बैजल, लक्ष्मण सावजी, कृष्णा नागरे आणि जॉगर्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने रंजय यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल आणि पराग सूर्यवंशी यांनी प्रत्येकी ११ हजार रुपयांचे रोख पारितोषिक यावेळी रंजय यांना दिले.

अत्यंत आनंद
-मागीलवर्षी मी २४ तास चालण्याचा विक्रम केला, त्याचवेळी १०० तास पूर्ण करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार, यंदा मी तो संकल्प पूर्ण करू शकल्याने अत्यंत आनंद झाला आहे. एकदा मनाचा निश्चय झाला की काहीही साध्य करता येते, हेच मला या विक्रमातून दाखवून द्यायचे होते. रंजयित्रवेदी
तीन मिनिटे विश्रांतीही टाळली
सलगचार दिवस चालताना केवळ नैसर्गिक विधी आणि तत्सम आवश्यक बाबींसाठीच रंजय यांनी काही क्षण चालण्यात खंड केला होता. आंतरराष्ट्रीय मानकानुसारदेखील तितका वेळ संबंधितांना ग्राह्य धरला जातो. प्रत्येक तासामागे सुमारे मिनिटांची विश्रांती घेण्याची मुभा असते. मात्र, ही मिनिटे एकत्र करून दहा तासांनी अर्धा तास विश्रांती घेण्याची मुभा नसते. त्यामुळे रंजय यांनी अशा प्रकारची मिनिटांची विश्रांती घेऊन चालण्याच्या गतीला विराम देणेदेखील टाळले.
गतवर्षी सलग २४ तास : गतवर्षीत्रिवेदी यांनी सलग २४ तास चालत गोल्फ क्लबला २०८ फेऱ्या पूर्ण करीत सुमारे १६५ किलोमीटरचे अंतर कापले होते. त्याआधी वर्षभरच त्यांचा अपघात झाल्याने पायाचे ऑपरेशन करण्यात आले होते. तरीदेखील गतवर्षी त्यांनी २४ तासांचा संकल्प पूर्ण केला होता. त्यानंतर यंदा त्यांनी थेट विश्वविक्रमालाच गवसणी घालण्याचे निश्चित केले.

चिनीयुवकाचा विक्रम मोडणार : चीनच्यायुवकाने काही वर्षांपूर्वी सलग ५४ तास चालून ४४६ मैल अंतर कापले होते. मात्र, त्याचे वय त्यावेळी अवघे २५ वर्षे होते, तर रंजय त्रिवेदी यांनी १०० तासांच्या चालीमध्ये गोल्फ क्लब ६३८.८ फेऱ्या पूर्ण करून ५१० किमी अंतर कापले.