आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंचवटीतील शंभरावर लाॅन्स अनधिकृत; परवानगी घेतल्यास फिरणार बुलडाेझर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पंचवटी विभागात शंभरावर लाॅन्स असून त्यातील केवळ एकाच लाॅन्सच्या बांधकामासाठी महापालिकेच्या नगररचना विभागातून परवानगी घेण्यात अाली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस अाला अाहे. विशेष म्हणजे नगररचना विभागाने २००७ ते २००९ या काळात तब्बल ५५ लाॅन्सला अनधिकृत बांधकामांसाठी नाेटीसा बजावलेल्या असताना या नऊ वर्षांच्या काळात त्यातील केवळ लक्ष्मीविजय लाॅन्सचा अपवाद वगळता अन्य लाॅन्सधारकांनी पालिकेच्या नाेटीसा केराच्या टाेपलीत टाकल्याचे स्पष्ट झाले अाहे. बांधकाम परवानग्याच घेतल्याने संबंधित लाॅन्स चालकांनी पार्किंगच्या नियमांचाही खेळखंडाेबा केल्याचे दिसते. त्यामुळे या परिसरात नागरिकांना वाहतूक काेंडीला नेहमीच सामाेरे जावे लागते. दरम्यान, सर्वच अनधिकृत लाॅन्सचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. 

 

नाशिक-औरंगाबाद मार्गावरील नांदूरनाका ते नांदूरगावापर्यंतच्या रस्त्यालगतच शंभराहून अधिक लॉन्स, मंगल कार्यालये आहेत. तपोवन, द्वारका, टाकळीरोड भागातही ही कार्यालये आहेत. या लॉन्सचालकांकडून वाहनतळासाठी पुरेशी जागा सोडण्यात आल्याने वऱ्हाडी-पाहुणे मंडळींची वाहने रस्त्यावरच उभी राहतात. लग्न तिथीच्या दिवशी मंगल कार्यालयांच्या रस्त्यांवर दुचाकींसह बस, जीप, कारचालकांना तासन‌्तास कोंडीत अडकून पडावे लागत आहे. वास्तविक, महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६७ नुसार कोणत्याही व्यावसायिक वापर संकुलात (मंगल कार्यालय) पार्किंगसाठी किती जागा राखीव ठेवावी, याचे स्पष्ट निर्देशन केले आहे. त्यानुसार ५० चौरस मीटर बांधकाम क्षेत्रासाठी १३५ चौरस फुटाची जागा कारसाठी राखीव ठेवावी. या नियमाला सर्वत्र छेद देण्यात अालेला दिसताे. कार्यालये भाड्याने देताना लाखो रुपयांचा नफा कमविणाऱ्या संबंधित लाॅन्सच्या व्यवस्थापकांनी बांधकामांसाठी अाजवर महापालिकेची परवानगीच घेतली नसल्याचे दिसून येते. या संदर्भात महापालिकेच्या नगररचना विभागाने २००७ मध्ये ३४, २००८ मध्ये तर २००९ मध्ये १७ लाॅन्सला अतिक्रमण पाडण्यासंदर्भात नाेटीसा बजावण्यात अाल्यात. मात्र त्यानंतर केवळ लक्ष्मीविजय लाॅन्सच्या व्यवस्थापनाने ४० लाख रुपये भरुन महापालिकेची परवानगी घेतली. अन्य लाॅन्स चालकांनी मात्र नाेटीसांकडे दुर्लक्ष केले. 

 

नगररचनेचे कामकाजही संशयास्पद 
विशेष म्हणजे नगररचना विभागाने संबंधित लाॅन्सचालकांना २००७ ते २००९ दरम्यान अतिक्रमण पाडण्याच्या नाेटीसा बजावल्यानंतर पुढील काळात काेणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे नगररचना विभागाचा कारभारच संशयाच्या भाेवऱ्यात सापडला अाहे. सर्वसामान्यांच्या बाबतीत मात्र वेगळा न्याय असताे. 

 

संबंधित लाॅन्सचे अतिक्रमण काढणार 
पंचवटी विभागातील केवळ एकच लाॅन्सचालकाने बांधकामासाठी परवानगी घेतली अाहे. बाेटावर माेजण्याइतक्या काही लाॅन्सचालकांनी परवानगीसाठी अाता प्रस्ताव सादर केले अाहेत. उर्वरित लाॅन्सचालकांना तातडीने नाेटीसा देण्यात येऊन अतिक्रमणे काढण्यात येतील. 
- पी.बी. चव्हाण, कार्यकारी अभियंता, नगररचना विभाग 

 

का घेतल्या नाहीत परवानग्या? 
हरित क्षेत्रातून पिवळ्या पट्ट्यात जागांचे रुपांतर झाल्यानंतर अनेकांनी या परिसरात लाॅन्सचा व्यवसाय सुरु केला. मात्र त्यासाठी महापालिकेतून बांधकामाची परवानगी घेण्याच्या नियमाचे मात्र पालन केले नाही. परवानगीसाठी काही लाखांत शुल्क भरावे लागणार असल्याने लाॅन्स चालकांकडून नियमभंग केला जाताे. 

 

महापाैरांनीही घेतली नुकतीच परवानगी 
म्हसरूळ येथील अनधिकृत लाॅन्सवर छापा टाकून पितळ उघडे पाडणारे महापाैर रंजना भानसी यांच्या मालकीच्या नाथकृपा मंगल कार्यालयाबाबतही शंका उपस्थित केली जात हाेती. या कार्यालयाला बांधकामाची परवानगी नसल्याची चर्चा हाेती. बांधकामाची परवानगी अापण नगररचना विभागातून नुकतीच घेतली असल्याचे भानसी यांनी स्पष्ट केले. 

 

केवळ पंचवटीतून ३० काेटींचे उत्पन्न मिळणे शक्य 
एकामाेठ्या लाॅन्सच्या परवानगीसाठी नगररचना विभागात सुमारे ३० ते ४० लाख रुपये बांधकाम शुल्क भरावे लागते. पंचवटीत शंभर लाॅन्स गृहीत धरल्यास महापालिकेला किमान ३० काेटींचे उत्पन्न मिळणे शक्य अाहे. 

बातम्या आणखी आहेत...