नाशिक - किरकोळ भांडणातून पतीने पत्नीवर कोयत्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना नाशकात सोमवारी घडली. शहरातील म्हाडा वसाहतीत हा प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता दिलीप पठाडे (वय ३०, रा. म्हाडा कॉलनी, चेतनानगर) असे जखमी महिलेचे नाव आहे. सोमवारी दुपारी
विवाहितेचा पती दिलीप पठाडे यांच्याबरोबर दुचाकी विक्री केल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यामुळे राग आल्याने दिलीपने अनिताच्या डोक्यात कोयत्याने वार केले. गंभीर अवस्थेमध्ये तिला रुग्णालयात दाखल केले. इंदिरानगर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा पतीवर दाखल करण्यात आला असून पठाडेला अटक करण्यात आली आहे.