नाशिक- दारूच्या नशेत पत्नीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपी पती सर्जेराव उन्हाळे यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मंगळवारी (दि. १) जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठवली.
पंचवटी परिसरातील वडजाईमाताजवळ सर्जेराव उन्हाळे पत्नी सामीसह रहात होता. मद्याच्या नशेत तो अपत्य होत नसल्याने पत्नीला मारहाण करत होता. ११ जुलै २०१५ मध्ये सर्जेराव यानेसोन्याची अंंगठी मागण्याच्या कारणावरुन पत्नी सीमाला मारहाण केली. ओढणीच्या साह्याने तिचा गळा आवळून खून केला. पंचवटी पोलिसांनी त्यास अटक केली. जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या न्यायालयात खटाल सुरु होता. मंगळवारी या खटल्याचा निकाल लागला. न्यायाधीश शिंदे यांनी आरोपी सुर्यकांत उन्हाळे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. विद्या जाधव यांनी कामकाज पाहिले. वैद्यकीय अधिकारी आणि साक्षीदाराची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली. तत्कालीन तपासी अधिकारी एल. बी. करांडे यांनी तपास केला.