आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - पती-पत्नीच्याभांडणात पतीने पत्नीचा गळा अावळून खून केल्याची दुर्दैवी घटना साेमवारी संसरी गावात घडली. अाश्विनी राेहित मकवान (२६, रा. संसरी) असे मृत महिलेचे नाव अाहे.
पाेलिसांच्या माहितीनुसार, राेहित रमेश मकवान (२९) पत्नी, पाच वर्षांची मुलगी तीन वर्षांच्या मुलासह खळे भागातील यक्षिका साेसायटीत फ्लॅट क्रमांक अकरामध्ये भाडेतत्त्वावर राहत हाेता. पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडणे हाेत. साेमवारी किरकाेळ कारणावरून दाेघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात राेहितने पत्नीस मारहाण करून करदोड्याने गळा अावळून अाश्विनीचा खून केला.

यानंतर ताे देवळाली कॅम्प भागात राहणारा त्याचा भाऊ हेमंत यांच्याकडे गेला पत्नीच्या खुनाची कबुली िदली. भावाने त्यास पाेलिस निरीक्षक राजेश अाखाडे यांच्या ताब्यात दिले. देवळाली कॅम्प पाेलिसांत या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करत संशयित पती राेहित यास अटक केली अाहे.