आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband Lifetime Punishment At Nashik For Wife Murder

नाशिक: पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस पेटवून देणार्‍या पतीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
चुंचाळेतील पाटील पार्क येथील आरती अनिल बोरसे हिला 13 जून 2011 रोजी राहत्या घरात पती अनिल रामदास बोरसे याने चारित्र्याचा संशय घेत पेटवून दिले होते. यात गंभीरपणे भाजलेल्या आरतीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना पाच दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अंबड पोलिसांत आरतीचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवून त्याआधारे अनिल बोरसेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश एच. सी. महाजन यांच्यासमोर झाली. न्यायालयाने बोरसेविरुद्ध पुरावा सिद्ध झाल्याने त्यास जन्मठेप व पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली.