आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी चमत्कारी नाही; वर्ष तरी द्या : राज ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - माझ्याकडे चमत्कार नाही, शहराचा विकास करण्यासाठी किमान एक वर्षभर तरी वाट पाहावीच लागेल, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना बुधवारी केले. शहर विकासासंदर्भात केल्या जाणार्‍या उपाययोजनांविषयी मात्र ठाकरे यांनी मौन बाळगले.

ठाकरे पुढे म्हणाले की, 14 वर्षांत नाशिक शहराची दैना झाली. मोठे फॅर लागलेय. त्यामुळे तात्पुरते पॅचेस मारून उपयोग होणार नाही. राजकारणासाठी नाशिकचा वापर करीत नसून विकासाची पॅशन असल्यामुळे काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणतेही काम करण्यासाठी प्रक्रिया महत्त्वाची असते. त्या पद्धतीनेच काम सुरू असल्यामुळे वेळ लागेल हे लक्षात घेतले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मीडियावरही घसरले : शासकीय विर्शामगृहात ठाकरे यांनी पत्रकारांना चहापानाला आमंत्रित केले होते. पत्रकार परिषद नाही तर अनौपचारिक चर्चा आहे, असे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. पत्रकारांनी शहराच्या विकासाबाबत प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्यावर मात्र ठाकरे यांचा मूड पालटला. ठाकरे म्हणाले की, 14 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता होती, त्यांनी काय केले हे कधी विचारले का? मनसेच्या सत्तेला एक वर्ष झाले. अजून एक वर्ष तरी द्या. माझी कामेच काय ते उत्तर देतील. नेहमी हातात पुरावे घेऊन विरोधकांच्या गैरप्रकारांची चिरफाड करणारे ठाकरे बुधवारी मात्र पत्रकारांनाच सखोल माहिती घ्या असा उपदेश करीत होते. शहर विकासासंदर्भातील उपाययोजनांबाबत प्रश्न आल्यावर ठाकरे यांनी नेहमीच्या शैलीत ‘जय महाराष्ट्र’ म्हणत पत्रकारांचा निरोप घेतला.


.तर स्वतंत्र यंत्रणेमार्फत कामे करा : सिंहस्थासाठी पालिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्यामुळे शासनाने पैसे दिले पाहिजे. पालिकेवर विश्वास नसेल तर स्वयंत्रणेमार्फत कामे करा, आमची हरकत नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. सिंहस्थाच्या नियोजनास निधी देण्यात विलंब होत असल्याच्या मुद्यावर ठाकरे बोलत होते.