आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजविघातक प्रवृत्तीला अाता ‘आय वॉच’ची जरब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- समाजातील विघातक प्रवृत्तीला अाळा घालण्यासाठी पोलिस दलाकडून विविध प्रकारे प्रयत्न केले जातात. बऱ्याचदा विघातक कृत्य करणारे पोलिसांच्या हाती लागत नाहीत. अशा समाजकंटकांना जेरबंद करण्यासाठी ‘आय वॉच’ मोबाइल अॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. शुक्रवारी पोलिस आयुक्तालयात खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते या अॅपचे उद््घाटन करण्यात आले.
पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त संदीप दिवाण, निसार तांबोळी यांच्यासह पोलिस अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. इंडियन अाय सिक्युरिटी प्रा. लि. कंपनीने हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. परिसरात एखादी अप्रिय घटना घडल्यास या अॅप्सद्वारे काही सेकंदांत त्या घटनेची सर्व माहिती पोलिसांपर्यंत पोहोचणार आहे. कंपनीने नोएडा आणि दिल्ली येथे केलेल्या या प्रयाेगाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्रात नाशिकमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला अाहे. आय वॉच हे तत्काळ मदत करणारे अॅप्लिकेशन आहे. संकटकालीन परिस्थितीमध्ये ‘आय वॉच’चे बटण दाबल्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाला त्या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ, लोकेशेन पोलिस आणि संबंधिताच्या नातेवाइकांना मिळते. पोलिसांना अॅलर्टचा संदेश जीपीएसद्वारे मिळेल. यामुळे तत्काळ पाेलिसांना घटनास्थळाकडे धाव घेता येईल. विशेष म्हणजे, हे अॅप्लिकेशन नागरिकांना मोफत दिले जाणार आहे.

यात मदतकारक :
घरफोडी,अपघात, सोनसाखळी चोरी, वैद्यकीय मदत, लैंगिक अत्याचार, संशयास्पद व्यक्ती रॅगिंग.
अाय वाॅच अॅप करते असे कार्य
अँड्रॉइडमोबाइलवरील या अॅपचे बटण दाबल्यास पोलिस नियंत्रण कक्षाला गुन्हा ज्या ठिकाणी घडला त्या स्थ‌ळाचे लोकेशन जनरेट होईल संदेश प्राप्त होईल. काही सेकंदांत गुन्ह्याच्या घटनेचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाईल तसेच महिला हेल्पलाइन, मित्र, नातेवाईक पोलिसांना अापाेअाप संदेश प्राप्त होईल. या संदेशामुळे घटनास्थळाजवळच्या पोलिसांकडून मदत प्राप्त होईल.

सुरक्षेच्या दृष्टीने फायदेशीर
शहरआणि परिसरात घडणारे विविध प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी हे सॉफ्टवेअर फायदेशीर ठरणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा पोलिस दलास मदत करावी. कुलवंतकुमारसरंगल, पोलिसआयुक्त