आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी शपथपूर्वक सांगतो की, नायलॉन मांजा वापरणार नाही 128 शाळांमध्ये शपथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक: ‘मी शपथ घेताे की, पतंग उडविण्यासाठी अाजपासून मी नायलाॅनचा मांजा वापरणार नाही’, अशी शपथ महापालिकेच्या १२८ शाळांमधील सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांनी घेत नायलाॅनमुक्त संक्रांत साजरी करण्याचा नववर्षानिमित्त संकल्प केला. ‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या ‘मांजा जीवघेणा, दुर्घटनेचा फणा’ अभियानात महापालिकेच्या शिक्षण मंडळाने सक्रिय सहभाग दर्शवित मंगळवारी (दि. ३) बालिका दिनाचे अाैचित्य साधून सर्वच शाळांमध्ये हे अभियान राबविले. 
 
वडाळा येथील शाळा क्रमांक ४९, १८, १० ४३ येथे शिक्षण मंडळ सभापती संजय चव्हाण शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्या प्रमुख उपस्थितीत नायलाॅनमुक्त संक्रांत अभियान राबविण्यात अाले. यावेळी संजय चव्हाण म्हणाले की, नायलाॅन मांजाने अाजवर अनेकांचे जीव घेतले असून, जखमी हाेणाऱ्यांची संख्याही माेठी अाहे. 
 
दुसरीकडे पशू-पक्ष्यांनादेखील झाडावर वा अन्यत्र अडकलेल्या नायलाॅन मांजाचा फास बसत अाहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने गेल्या तीन वर्षांपासून नायलाॅन मांजा विराेधी अभियान सुरू करून जनजागृती केली अाहे. त्यास शिक्षण मंडळाने प्रतिसाद दिला अाहे. नितीन उपासनी म्हणाले की, सर्वाेच्च न्यायालय, उच्च न्यायालय, राज्य शासन अाणि अाता राष्ट्रीय हरित लवादानेही यासंदर्भातील निर्णय देत धाेकेदायक नायलाॅन मांजा विक्री, साठवणूक वापरास बंदी घातली अाहे. यापैकी एखादे कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात येणार अाहे. तसेच, संबंधिताचा दुकान परवानाही रद्द केला जाईल. 
 
शालेय अवस्थेत नायलाॅनमुक्त अभियानाची शपथ घेतल्यास त्याचा दृश्य परिणाम तातडीने दिसेल, असा विश्वासही उपासनी यांनी याप्रसंगी व्यक्त केला. नायलाॅन मांजा किती घातक अाहे याविषयी शाळांमध्ये विशेष मार्गदर्शनही करण्यात अाले. यावेळी उर्दू मराठी माध्यमांच्या बालिकांचा पेन्सिल देऊन सत्कार करण्यात अाला. 
 
‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या ‘मांजा जीवघेणा, दुर्घटनेचा फणा’ अभियानात महापालिकेच्या शिक्षण मंडळाने मंगळवारी सर्वच शाळांमध्ये अभियान राबविले. शिक्षण मंडळ सभापती संजय चव्हाण शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभियान राबविण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...