आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकला मिळावा आयएएस आयुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सध्या नाशिक महापालिकेचे कामकाज हे प्रभारी आयुक्तांच्या हाती आहे. मात्र, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा पार्श्वभूमीवर होणारे नियोजन आणि विकासाची कामे गांभीर्याने मार्गी लावण्यासाठी नाशिक महापालिकेला भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी नेमावा, अशी आग्रही मागणी अँडव्हेंटेज नाशिक फाउंडेशनच्या ‘नाशिक फस्र्ट’ या सामाजिक संस्थेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
किमान 20 लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या महानगरात पुढील वर्षी होणार्‍या कुंभमेळ्याची पूर्वतयारी प्रशासकीय पातळीवर जोरात सुरू आहे. या मेळाव्यासाठी किमान 25 ते 30 लाख भाविक, साधू- संत नाशिकमध्ये येतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. सिंहस्थाच्या काळात विशेषत: शाहीस्नानाच्या दिवसात शहरात बाहेरून आलेले आणि शहरात कायमस्वरूपी निवासास असलेले असे सुमारे 50 लाख लोक येथील किमान मूलभूत नागरी व्यवस्थेचा वापर करणार आहेत. त्यासाठी वाहतुकीचे नियोजन, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बळ, साधू-संत व लाखो भाविकांची निवास व्यवस्था, सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन अशी परिपूर्ण सिद्धता यशस्वी सिंहस्थासाठी अपेक्षित आहे. अशा अतिशय महत्त्वाच्या वेळी नाशिक महापालिकेचे कामकाज मात्र प्रभारी आयुक्तांच्या हातामध्ये आहे.
महत्त्वाचे म्हणजे सिंहस्थाच्या निमित्ताने केंद्र व राज्य सरकार यांच्याकडून भरीव आर्थिक तरतूद केलेली आहे. त्याचा वापर सुयोजित व योग्य कामासाठी आणि दूरगामी योजनांसाठी होऊन या सोयी सुविधा नाशिकरांना भविष्यात उपयोगी पडतील व या सर्व कामांमध्ये कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडणारा व काम करणारा धडाडीचा अधिकारी मिळावा, असेही नाशिक फोरमच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात केले आहे.