आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईस्क्रीम उद्योगाकडून कडक उन्हात स्वस्ताईचा थंडावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आईस्क्रीम तयार करण्यासाठी लागणारा दूध भुकटीसारखा कच्चा माल आणि वाहतुकीकरिता आवश्यक डिझेल स्वस्त झाल्याने त्याचा फायदा आईस्क्रीम कंपन्यांकडून थेट ग्राहकांना दिला जात आहे. कंपन्यांनी कमितीत उत्पादनांच्या बाजारमूल्यात बदल केला नसला तरी त्याच कमितीत आईस्क्रीमचे प्रमाण वाढवून दिले आहे. याशिवाय आकर्षक ऑफर्स देण्यात आल्याने महागाईच्या झळा सोसत असलेल्या सर्वसामान्यांना आईस्क्रीम उद्योगाकडून मात्र खऱ्या अर्थाने स्वस्ताईचा थंडावा दिला जात आहे.
आईस्क्रीम उत्पादकांच्या मते, मागील वर्षीच्या तुलनेत साखर, दूध दुधाची भुकटी हा आईस्क्रीम करिताचा कच्चा माल स्वस्त झाला आहे. याचा फायदा थेट ग्राहकांना दिला जात आहे. दुधाच्या भुकटीची निर्यात घटल्याने देशभरातील उत्पादकांना दिल्ली, हरीयाणा, कोल्हापूर येथून होणारी दुध भुकटीचा पूरवठा सुकर झाला आहे तर स्थानकि बाजारात दुधाचे दर लिटरमागे पाच ते सहा रूपयांनी घटले असून डिझेलचेही दर गतवर्षाच्या सिझनच्या तुलनेत १० रूपयांच्या आसपास प्रतीलीटरमागे घटले आहे. याचा परीणाम म्हणून उत्पादन मुल्य घटले असून त्याचा फायदा आईस्क्रमि पार्लर्समधून ग्राहकांना फॅमिली पॅक, कोन, कप, प्लॅस्टीक टबमधून वकि्री होणाऱ्या आईस्क्रमिव्दारे ळतो आहे. गतवर्षाच्या तुलनेत या सर्वच प्रकारांवर १०० ग्रॅम वर २० ग्रॅम फ्री, एका फॅमिलिपॅकसमवेत दुसरा फ्री अशा ऑफर्सचा फंडा पहायला मिळतो आहे.

या प्रकारांना सर्वाधकि मागणी
प्रमूखकंपन्यांच्या अमेरकिन ड्रायफ्रुटस्, बटर स्कॉच, जाफरानी बादाम, केशर-पिस्ता, फ्रेश मॅंगो, आईस्क्रमि टेस्टी, राजभोग, चॉकलेट अलमंडस्, केशर डिलाईट अशा प्रकारांना बाजारात सर्वाधकि मागणी आहे.

ग्राहकांना थेट फायदा
कमी उत्पादन मूल्याचा फायदा थेट ग्राहकांपर्यंत कंपन्यांकडून पोहोचविला जात आहे. किंमत कमी करता आहे त्याच कमितीत जास्त आईस्क्रीमच्या ऑफर्स दिल्या गेल्या आहेत.
आशिष नहार, व्यवस्थापकीय संचालक, क्रिमिका आईस्क्रीम

कंपन्यांच्या आकर्षक ऑफर्स अशा...
काहीआईस्क्रीम उत्पादक कंपन्यांनी थेट ग्राहकांना स्वस्ताईचा फायदा मिळवून देण्यासाठी १०० मिलि कोनऐवजी ११५ मिलिचा कोन, तर १० कोनवर कोन मोफत, लिटर पॅकवर २५ ते ३३ टक्के आईस्क्रीम जास्त, ७०० मिलिच्या (विशेष प्रकारातील) पॅकवर दुसरा पॅक मोफत अशा आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत. या ऑफर्समुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.