आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅक्टरांनीच अाणले अादर्श प्रिस्क्रिप्शनचे साॅफ्टवेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्यात शासनाने लागू केलेल्या अादर्श प्रिस्क्रिप्शनचा प्रचार प्रसार वेगाने सुरू असतानाच आणि प्रशासनाकडून कारवाई करण्याची घाेेषणा केली असतानाच, हे प्रिस्क्रिप्शन साॅफ्टवेअर स्वरूपात शहरातीलच चार डाॅक्टरांनी तयार केले अाहे. अादर्श प्रिस्क्रिप्शनचा वापर डाॅक्टरांनी सुरू करावा, यासाठी या साॅफ्टवेअरचे प्राथमिक व्हर्जन अगदी माेफत उपलब्ध करून देण्यात अाले अाहे. विशेष म्हणजे, अगदी जेमतेम संगणक वापरण्याची सवय असलेल्या डाॅक्टरांनाही हे साॅफ्टवेअर वापरता येईल.
अापण सर्वच जण अापल्या लहानपणापासून काेणत्या काेणत्या डाॅक्टरांना अाेळखताे. ते नेमके त्या प्रिस्क्रिप्शनवर काय लिहितात अाणि त्यामागचे शास्त्र काय, याचे कुतूहल सर्वांनाच असते. पण, स्वत: मेडिकलला प्रवेश घेतल्यानंतर कळाले की डाॅक्टरांना प्रिस्क्रिप्शनवर प्रत्येक शब्द लिहिताना िकती िनयम, अटींचा सामना करावा लागताे. सरकारी िनयम, त्यातही येणारे नवनवे िनयम यांचा ताळमेळ कसा घालावा लागताे, हे समजले.

या सर्वांतून डाॅक्टरांना िदलासा िमळावा, रुग्णांनाही िदलासा िमळावा स्वस्त अाैषधांचे पर्यायही उपलब्ध व्हावेत अाणि ती अाैषधे सुस्पष्ट अक्षरात लिहिलेली असावीत, हा िवचार घेऊन डाॅ. ललित पांचाळ, डाॅ. याेगेश मुद््गल, डाॅ. सम्राट पन्हाळकर अाणि डाॅ. हर्षल गुंजाळ यांनी असे साॅफ्टवेअर तयार करायचेच हा िनर्धार केला.
सध्या बाजारातील उपलब्ध साॅफ्टवेअर्स अत्यंत महागडे आणि समजण्यास कठीण हाेते. त्यावरही या नव्या साॅफ्टवेअरमधून ताेडगा काढून साेपे-सुटसुटीत साॅफ्टवेअर तयार करण्यासाठीचा चंग या चाैघांनी बांधला यासाठी साॅफ्टवेअर इंजिनिअर डाॅ. पांचाळ यांच्या पत्नी धनश्री यांची मदत घेतली. वर्षभराच्या परिश्रमानंतर टीमने ‘स्मार्ट क्लिनिक’ नावाचे हे साॅफ्टवेअर तयार केले. ते अाज काही िक्लनिक्समध्ये उत्तमरीत्या कार्यरत अाहे.
असे अाहे माेफत प्राथमिक व्हर्जन
‘स्मार्टिक्लनिक’ साॅफ्टवेअर कायमस्वरूपी वापरण्याकरिता, इन्स्टाॅल करून घेण्याकरिता िकमान चार हजारांपासून रक्कम अाकारली जाते. मात्र, ९५६१३६६९९० या माेबाइलवर काॅल करून डाॅक्टरांना हे व्हर्जन माेफत िमळविता येणार अाहे. या व्हर्जनव्दारे एमसीअायएम एमसीअाय यांच्या िनर्देशानुसार प्रिस्क्रिप्शन हवे तसे ते प्रिंट हाेते ते वापरण्यासाठी इंटरनेट असण्याची गरजही नाही.

काम होईल सोपे
‘दिव्यमराठी’ने सुरू केलेल्या ‘अादर्श प्रिस्क्रिप्शन’ या मालिकेचा उद्देश पाहून अाम्ही ‘स्मार्ट िक्लनिक’ या साॅफ्टवेअरचे प्राथमिक व्हर्जन अगदी माेफत उपलब्ध करून देत अाहाेत. यामुळे रुग्णांना जेनेरिक अाैषध अगदी सुवाच्य अक्षरात लिहून देणे डाॅक्टरांना शक्य हाेणार अाहे. डाॅ.ललित पांचाळ, साॅफ्टवेअरचे िनर्माते