आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईदगाहची आस्था केवळ प्रसिद्धीपुरती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शाहाजहानी ईदगाह मैदानावरील उतरती कळा लागलेल्या वास्तूबद्दल नगरसेवकांकडून व्यक्त होणारी आस्था ही केवळ प्रसिद्धीपुरता असल्याचा ठपका नागरिकांनी ठेवला आहे. तसेच, महापालिका प्रशासनाकडून डागडुजीकडे डोळेझाक होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे.

त्र्यंबकरोडवरील ईदगाह मैदानावर दरवर्षी रमजान व बकरी ईदला सामूहिक नमाजपठण केले जाते. तसेच ईदलाही विशेष नमाज पठण होते. या पार्श्वभूमीवर केली जाणारी रंगरंगोटी व नगरसेवकसह प्रशासनाधिकार्‍यांकडून पाहणी करताना फोटो काढले जातात. तसेच महापालिकेकडून तात्पुरत्या स्वरुपात स्वच्छता होते. ही वरवरची दिखाऊ कामगिरी वगळता महापालिकेकडून कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी उपाययोजना होत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. वास्तुच्या पायालगतची माती पाण्याने वाहून गेल्याने बांधकामाची पडझड होते आहे.

गांभीर्य हवे
कडूनिंब व वड वृक्षांमुळे वास्तूला तडे गेले असून ही वास्तू दिवसेंदिवस जीर्ण होत चालली आहे. ईदगाहच्या डाव्या बाजूला असलेल्या लहान मिनारच्या पडझडीला तीन ते चार वर्षे लोटली असली तरीही, त्याची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे महापालिकेने याकडे वेळीच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वसीम शेख, नागरिक