आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • If Congress Divert From Reservation Then Find Alternative : Maulana Madani

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरक्षणापासून कॉंग्रेस मागे हटल्यास वेगळा पर्याय शोधू : मौलाना मदनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - देशभरातील मुस्लिम धर्मीयांनी आजवर कॉँग्रेस पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. या परिस्थितीत सर्वच क्षेत्रांत मुस्लिमांना आरक्षण देण्याचा विषय पुढे येत असताना सत्ताधारी कॉँग्रेस मात्र मागे सरकत असेल, तर आगामी निवडणुकीत मुस्लिम धर्मीयांना वेगळ्या पर्यायाचा विचार करावा लागेल, असा इशारा जामेतुल उलेमाचे मौलाना सय्यद मेहमूद असद मदनी यांनी शुक्रवारी दिला.


मालेगावात मुस्लिम रिझर्व्हेशन फेडरेशनच्या विभागीय मुस्लिम आरक्षण परिषदेपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मौलाना अतहर सय्यद, फेडरेशनचे अध्यक्ष तथा माजी महापौर आसिफ शेख उपस्थित होते. मौलाना मदनी म्हणाले की, अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम बांधवांची सद्य:स्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे या समाजाला 20 टक्के आरक्षण गरजेचे आहे. गुणवत्ता असतानाही केवळ आरक्षणाअभावी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना अडचणी येत आहेत. त्यामुळे घटनेच्या कलम 341 मध्ये दुरुस्ती करण्यात यावी तसेच सच्चर कमिटीने दिलेल्या अहवालानुसार आरक्षण देण्यात यावे, अशी फेडरेशनची मागणी आहे.


आश्वासनांना बगल देण्याची कॉँग्रेस पक्षाची सवय
सत्तेत असलेल्या कॉँग्रेसला मुस्लिम धर्मीयांनी भरभरून सहकार्य केले आहे. परंतु आजवरचा अनुभव पाहता केवळ निवडणुकांच्या काळात आश्वासने द्यायची अन् निवडणुका झाल्यानंतर त्यांना बगल देण्याचे धोरण कॉँग्रेसने आखले आहे. हा प्रकार आता सहन केला जाणार नाही. आरक्षण मिळाल्याखेरीज मुस्लिम धर्मीय स्वस्थ बसणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. रात्री उशिरापर्यंत शहरात मुस्लिम आरक्षण परिषद सुरू होती.