आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If IT Companies Come In Nashik Mumbai Puneite Prefere

आयटी कंपन्या आल्यास मुंबई-पुणेकरांचीही मिळणार नाशिकला पसंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकच्या वातावरणात आर्द्रता नसल्याने व येथील वैविध्यपूर्ण पर्यावरणाची भुरळ देशभरातील आयटीयन्सला पडत असते. त्यामुळेच मुंबई-पुण्यासह इतर शहरांतील आयटीयन्स नाशिकला स्थायिक होण्यासाठी इच्छुक असतात. असे असले तरी स्थानिक आयटी कंपन्यांच्या र्मयादित क्षमतेमुळे ते नाशिकमध्ये येऊ शकत नाहीत, अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. आयटी परिषदेच्या माध्यमातून जर काही आयटी कंपन्या शहरात आल्या तर निश्चितच मुंबई-पुण्याच्या आयटी कंपन्यांत कार्यरत अनेक जण नाशिकला पसंती देणार आहेत. यामुळे शहरातील बांधकाम उद्योगासह इतर व्यवसायांनाही त्याचा फायदा होणार आहे.

आयटी तज्ज्ञांच्या मते, आयटीतील कामानंतर प्रत्येकाला मानसिक शांतता आणि स्वास्थ्य अपेक्षित असते. पुणे-मुंबई असो की बंगलोर या शहरांत आज ते दुरापास्त होत चालले आहे. मुंबईत सकाळी कामासाठी कंपनीत निघालेला कर्मचारी रात्री उशिरा घरी पोहोचतो, तर हिंजेवाडीतून पुण्यात पोहोचायलाही तास-दीड तास लागतो. यामुळे इंधन, वेळ, पैसा यांचा अपव्यय तर होतोच; शिवाय कौटुंबिक जीवन अनेकांच्या वाट्याला फार कमी येते. त्यामुळेच वैविध्यपूर्ण हवामान आणि ऋतू असलेल्या नाशिकला सेकंड होम असावे, अशी मुंबई-पुणेकरांची इच्छा असते, हे नाशिकमधील घरांना या शहरांतून असलेल्या मागणीने सातत्याने दाखवून दिले आहे.


पसंती या बाबींमुळे
पॉवर फॅक्टर : मुंबई-पुण्यातील हवेतील जादा आद्र्रतेने वातानुकूलित यंत्रणेशिवाय तेथे काम करणे शक्य नसते, तर नाशिकमध्ये वर्षातील आठ महिने पंख्याचीही गरज पडत नाही. यामुळे कंपन्यांचे वीजबिल घटते. या पॉवर फॅक्टरमुळे कंपन्या येथे येण्यास इच्छुक आहेत.


उत्तम कनेक्टिव्हिटी : येथील 20 आयटी कंपन्यांपैकी काहींकडे एक जीबीपीएस क्षमतेच्या नेटवर्क लाइन्स आहेत. ही क्षमता पुण्या-मुंबईतील कंपन्यांच्या तोडीची आहे. टाटा, बीएसएनएल, एअरटेल, व्होडाफोन आदी कंपन्यांकडून उत्तम नेटवर्क उपलब्ध आहे.


शिक्षण-आरोग्याच्या सुविधा : शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्था व देशपातळीवरील ख्यातीप्राप्त तज्ज्ञ डॉक्टर्स आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत.


20 मिनिटांत होते शहर पार : वीस मिनिटांत नाशिक शहराच्या एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यात जाता येते. प्रस्तावित रिंगरोडमुळे हे अंतर आणखी कमी होऊ शकणार आहे.