आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामकुंडावरील रंगकामाला "आयआयए'चा विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अति प्राचीन वास्तू असलेल्या रामकुंडाला सिंहस्थानिमित्त करण्यात येणाऱ्या रंगरंगोटीला विराेध करणारे िनवेदन नाशिकच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट्स या संघटनेने पालकमंत्री गिरीश महाजन यांना देऊन हे काम त्वरित थांबविण्याची मागणी केली. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा आर्किटेक्ट सुवर्णा पाटील, स्मिता कासार, अमृता पवार या उपस्थित होत्या.
निवेदनात म्हटले आहे की, रामकुंड हेरिटेज व्हॅल्यू आणि अतिप्राचीन वास्तूत मोडत असल्याने त्याला रंगकाम करणे चुकीचे ठरणार आहे. तसेच, रामकुंडावर यापूर्वी केलेल्या रंगकामाचा रंग आता निघत आहे. मात्र, प्रशासन तो रंग काढण्याचे सोडून नवीन रंग देत आहे. नाशिकच्या सिंहस्थाकडे केवळ देशाचेच नव्हे, तर जगाचे लक्ष लागून असल्याने येथील अतिप्राचीन वास्तूंना रंग देऊन आपणच आपले महत्त्व कमी करीत आहाेत. तसेच, प्राचीन संस्कृतीला त्यामुळे गालबोट लागल्यासारखे होणार आहे. रंग काढून सँड ब्लास्टिंगसारख्या प्रक्रियेद्वारे रामकुंडास मूळ स्वरूप प्राप्त करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देताना इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट्सच्या अध्यक्षा आर्किटेक्ट सुवर्णा पाटील, अमृता पवार अन्य पदाधिकारी.