आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयटी-जेईई परीक्षा आता मराठीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आयआयटी-जेईई आणि अँडव्हान्स 2014 या दोन परीक्षा देणार्‍या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आत मराठी माध्यमाचा पर्याय निवडता येणार आहे.
या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची 15 डिसेंबर ही अंतिम मुदत असून, ज्यांनी यापूर्वी अर्ज केला आहे, त्यांच्यासाठी जानेवारी महिन्यात एडिट पर्याय खुला होणार आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांना बदल करण्याची संधी राहणार आहे. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या सन 2014-15 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी ‘जेईई-मेन’ देणे आवश्यक असते. परंतु, यामध्ये मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजीतील प्रश्न समजण्यास अवघड जाते. त्यामुळे कमी गुण प्राप्त होतात ही अडचण बघून या परीक्षांसाठी मराठीचा पर्याय असावा यासाठी राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्रा. अनिल गोरे यांनी केंद्राकडे केलेल्या मागणीचा विचार करून या परीक्षेसाठी मराठी माध्यमाला परवानगी दिली आहे.
मराठीतून प्रश्नपत्रिका
आयआयटी - जेईई आणि अँडव्हान्स 2014 या दोन्ही परीक्षांचा अर्ज भरताना पेन आणि पेपर पद्धत निवडल्यानंतर महाराष्ट्रातील चार परीक्षा केंद्रांचा पर्याय समोर येतो. तो निवडल्यानंतर उत्तराची भाषा निवडण्याचा पर्याय येतो. त्यामध्ये मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी हे पर्याय आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांनी मराठीचा पर्याय निवडल्यानंतर परीक्षेच्या वेळी मराठी प्रश्नपत्रिका उपलब्ध होईल.
केंद्र शासनाची परवानगी
आयआयटी-जेईई ही परीक्षा यापूर्वी हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून घेण्यात येत होती. केंद्राने आता मराठी, गुजराथी, उर्दू भाषेसाठी परवानगी दिली असून, इतर प्रादेशिक भाषांना परवानगी मिळालेली नाही. प्रा. अनिल गोरे, सदस्य, भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन