आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी डाॅ. लहाडे यांच्याविराेधात गुन्हा, अाठवडाभरात दुसरा गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हा शासकीय रुग्णालयात बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी अखेर स्त्रीराेगतज्ज्ञ डाॅ. वर्षा लहाडे यांच्याविराेधात महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने सरकारवाडा पाेलिस ठाण्यात फिर्याद दिल्यामुळे रात्री उशिरा गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अाठवडाभरात डाॅ. लहाडे यांच्याविराेधात दुसरा गुन्हा दाखल झाला असून, पहिल्यापेक्षा या गुन्ह्याची तीव्रता अधिक असल्यामुळे त्यांच्याभाेवती अाता कारवाईचा फास अधिक अावळला जाणार अाहे. 
जिल्हा शासकीय रुग्णालयात २२ मार्च राेजी दाखल असलेल्या निफाडमधील उंबरखेडच्या मातेचा बेकायदेशीर गर्भपात झाल्याचे महापालिका वैद्यकीय पथकाला अाढळले हाेते. ‘दिव्य मराठी’ने या प्रकरणाचा भांडाफाेड केल्यावर खऱ्या अर्थाने चाैकशीला वेग अाला. डाॅ. लहाडे यांचीच भूमिका अधिक महत्त्वाची असल्याचे लक्षात अाल्यावर अाराेग्यमंत्री दीपक सावंत यांनी या प्रकरणी प्रथम अाराेग्य उपसंचालक तर त्यानंतर अाराेग्य सहसंचालकांमार्फत सखाेल चाैकशी केली. याव्यतिरिक्त जिल्हा शासकीय रुग्णालयस्तरावरील चाैकशीत डाॅ. लहाडे दाेषी अाढळल्या. चार वेगवेगळ्या स्तरावरील चाैकशीत डाॅ. लहाडे यांच्यावरील गंभीर अाराेपांना पुष्टी मिळत असल्यामुळे विधिमंडळात त्यांना निलंबित करण्याबराेबरच बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी फाैजदारी गुन्हा दाखल करण्याची घाेषणा अाराेग्यमंत्र्यांनी केली. याव्यतिरिक्त सरकारी सेवेत असून खासगी वैद्यकीय व्यवसाय करणे, गर्भलिंग निदान करणे असे विविध ठपके ठेवत त्यानुसार कारवाईचे पत्रे जिल्हा शल्यचिकित्सक महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांना राज्य शासनाने पाठवले. महापालिकेने बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी डाॅ. लहाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी शनिवारी सायंकाळी कारवाई सुरू केली. 

अातापाेलिसांची वाढली जबाबदारी :म्हसरूळ पाेलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात डाॅ. लहाडे यांच्याविराेधात गंभीर अाक्षेप नसल्यामुळे अटकेबाबत फारशा हालचाली झाल्या नव्हत्या. म्हसरूळ पाेलिसांच्या म्हणण्यानुसार दाखल कलमाचा विचार केला तर सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षा नसल्यामुळे अाराेपीला अटक केलीच पाहिजे, असे बंधन नसल्याचे सांगितले गेले हाेते. मात्र, अाता सिव्हिलमधील बेकायदेशीर गर्भपाताचे प्रकरण गंभीर असल्यामुळे याप्रकरणी पाेलिसांची जबाबदारी वाढणार अाहे. डाॅ. लहाडे यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे अाव्हान त्यांच्यावर असणार अाहे. 

महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांकडून फिर्याद : डाॅ.लहाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिकेच्या डाॅक्टरांचे पथक सकाळपासून कार्यरत हाेते. सायंकाळी वाजता पथक सरकारवाडा पाेलिस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर तब्बल रात्री अकरा वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हाेते. महापालिकेचे अाराेग्य अधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. 

बेकायदेशीर गर्भपाताचा गुन्हा सिद्ध झाल्यास हाेऊ शकताे अाजन्म कारावास 
डाॅ. वर्षा लहाडे यांच्याविरुद्ध गर्भपातासंदर्भातील कलम ३१२ ते ३१८ पर्यंतचे सर्व गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत. या गुन्ह्यात गर्भपात घडवून अाणणे, गर्भाचा मृत्यू घडवून अाणणे, मूल जिवंत जन्मास येण्यास प्रतिबंध करणे असे अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत. यासाेबतच प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध नियंत्रण कायद्यांतर्गत (एमटीपी) कलम (४)(ब) चे उल्लंघन केल्याचाही गुन्हा नाेंदविण्यात अाला अाहे. यातील गुन्हे सिद्ध झाल्यास प्रत्येक गुन्ह्यात अाजन्म कारावासाची शिक्षेची तरतूद असल्याची माहिती सरकारवाडा पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डाॅ. सीताराम काेल्हे यांनी दिली. 

डॉ. लहाडे यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी 
डॉ.वर्षा लहाडे यांच्या अटकपूर्व जामिनावर साेमवारी (दि. १७) जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार अाहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. सी. शर्मा यांच्या न्यायालयात ही सुनावणी हाेईल. डॉ. लहाडे यांच्यावर जिल्हा रुग्णालयासह त्यांच्या खासगी हाॅस्पिटलमध्ये गर्भपात केल्याचा ठपका अाहे. म्हसरूळ पोलिस ठाण्यात डॉ. लहाडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. अटक टाळण्यासाठी डाॅ. लहाडे यांनी जिल्हा न्यायालयात बुधवारी (दि. १२) अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यावर सुनावणी झाल्यामुळे अाता सोमवारी सुनावणी हाेणार अाहे. 
जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोगतज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांच्याविरोधात बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेले महापालिकेच्या डॉक्टरांचे पथक. 
बातम्या आणखी आहेत...