आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध मद्यविक्री करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला शिवसैनिकांचा चाेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड -  डाॅ.आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद होती. मात्र, नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटररोडवरील आनंदऋषी शाळेसमोरील चाॅइस हाॅटेल येथे मद्यविक्री होत असल्याची चर्चा असल्याने मद्यपींनी १४ एप्रिल रोजी सायंकाळी वाजेच्या सुमारास मद्य खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र, मद्यविक्री बंद असल्याचे हाॅटेलचालक आणि भाजपचे महानगर चिटणीस युनूस सय्यद यांनी सांगितले. याचदरम्यान काही शिवसैनिकांनी शिवजयंती वर्गणीच्या ११ हजार रुपयांची मागणी केली. यावेळी सय्यद यांनी एकवीसशे रुपये दिले. त्यावेळी शिवसैनिकांना याचा राग आल्याने त्यांनी हाॅटेलच्या काउंटरची तोडफोड केली. याप्रकरणी चाैघांवर उपनगर पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
भाजपचे महानगर चिटणीस नाशिकरोड हाॅकर्स युनियनचे अध्यक्ष युनूस सय्यद यांचे हाॅटेल चाॅइस अाहे. या ठिकाणी बिअर शाॅपीही असल्याने मद्य खरेदी करणाऱ्यांची येथे गर्दी मोठ्या प्रमाणात असते. डाॅ. आंबेडकर जयंती असल्याने शहरातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद होती. मात्र, हाॅटेल चाॅइस येथे मद्यविक्री होत असल्याची चर्चा परिसरात समजल्याने मद्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, याचदरम्यान शिवसेनेचे माजी उपमहानगरप्रमुख श्याम खोले, सुनील जाधव, अतुल सूर्यवंशी, सोनू गायकवाड हेशिवजयंतीच्या वर्गणीचे रक्कम शिल्लक असल्याने मागण्यासाठी गेले असता, सय्यद यांनी ११ हजार रक्कम खूप हाेतात असे सांगत एकवीसशे रुपये दिले. यावरून वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात सय्यद हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी या चारही संशयितांनी लाख १२ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची चेन, १२ हजार ७०० रुपये असा एकूण एक लाख २५ हजार २०० रुपयांच्या ऐवजांची चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला. उपनगर पोलिसांनी तत्काळ या घटनेची दखल घेऊन श्याम खोले आणि सोनू गायकवाड यांना रात्री उशिरा ताब्यात घेतले तर सुनील जाधव आणि अतुल सूर्यवंशी यांना शनिवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले. 

जखमी युनूस सय्यद 
...तर सेना स्टाइल आंदोलन 

शासन नियमांची पायमल्ली करून नागरी वसाहतीत विनापरवानगी शाळेजवळ मद्यविक्री दुकानांना परवानगी नसतानाही हे हाॅटेल सुरू अाहे. त्यामुळे नाशिकरोडमधील महिला विद्यार्थ्यांच्या हितासाठी अशा व्यावसायिकांविराेधात शिवसेना स्टाइलने आंदोलन केले जाईल, अशी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी उपनगर पोलिस ठाणे परिसरात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 
बातम्या आणखी आहेत...